Google Play Pass भारतात लाँच, ‘या’ सब्सक्रिप्शन सर्व्हिसना होणार ‘हे’ फायदे

एक महिन्याच्या ट्रालयनंतर दर महिना ९९ रुपयांचे सब्सक्रिप्शन द्यावे लागू शकते. Google Play Passचे वर्षाचे सब्सक्रिप्शन ८८९ रुपये आहे. तर प्रीपेड सब्सक्रिप्शनचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. एक महिन्याचे प्रीपेड सब्सक्रिप्शन १०९ रुपयांना उपलब्ध आहेत.

Google play pass launched in india
Google Play Pass भारतात लाँच, 'या' सब्सक्रिप्शन सर्व्हिसना होणार 'हे' फायदे

Google Play Pass : गूगलने भारतात Google Play Pass लाँच केले आहे. एंड्राइड युझर्सना या आठवड्यापासून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ही एक सब्सक्रिप्शन सर्विस असून यातून युझर्सना जाहिरात फ्री व्हिडीओ पाहण्याचा अनुभव मिळणार आहे. google Play Pass ची सर्व्हिस या वेळी ९० देशांमध्ये सुरू करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Google Play Pass सब्सक्रिप्शन ४१ कॅटेगरीजमध्ये १ हजारहून अँप्स कोणत्याही जाहिरातीशिवाय घेता येणार आहेत.  या ४१ कॅटेगरीमध्ये भारतासहीत ५९ देशातील कलेक्शनचा समावेश आहे. या सुविधेचा फायदा घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. भारतात याचा एक महिन्याचा ट्रायल ऑप्शन देखील देण्यात आला आहे.

एक महिन्याच्या ट्रालयनंतर दर महिना ९९ रुपयांचे सब्सक्रिप्शन द्यावे लागू शकते. Google Play Passचे वर्षाचे सब्सक्रिप्शन ८८९ रुपये आहे. तर प्रीपेड सब्सक्रिप्शनचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. एक महिन्याचे प्रीपेड सब्सक्रिप्शन १०९ रुपयांना उपलब्ध आहेत. Google Play Pass चे सब्सक्रिप्शन तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करु शकता. या सब्सक्रिप्शन सर्विसमुळे भारतीय अँप देखील सर्वाधिक फायदा मिळवू शकतात.

Google Play Passचे सब्सक्रिप्शन घेण्याचा फायदा काय ?

Google play Passचा सर्वाधिक फायदा हा डेव्हलपर कम्युनिटीला होणार आहे. युझर्सना देखील याचा होणारा फायदा हा येणाऱ्या दिवसात कळेल. या सर्व्हिस लाँचसह भारतीय डेव्हलपर्सना अँप्स आणि गेम्सना ग्लोबल युझर्सपर्यंत पोहोचवण्यास मदत मिळणार आहे.


हेही वाचा – Russia Ukraine War : फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने रशियाला केलं बॅन