घरटेक-वेकहोंडा कार्स इंडियाने लाँच केली होंडा डब्ल्यूआर-व्ही

होंडा कार्स इंडियाने लाँच केली होंडा डब्ल्यूआर-व्ही

Subscribe

होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रीमियम कार्स उत्पादन कंपनीने आज आपल्या प्रीमियम स्पोर्टी लाइफस्टाइल व्हेईकल Honda WR-V पूर्णपणे नवीन डिझेल व्ही श्रेणी तसेच या विभागातील अग्रगण्य सुविधांसह अधिक सुधारित S व VX श्रेणी बाजारात आणली.

होंडा कार्स इंडिया लिमिटेडच्या विक्री व मार्केटिंग विभागाचे संचालक तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश गोयल WR-V नवीन सुविधा तसेच सुधारणांबद्दल म्हणाले, Honda WR-V हे अव्वल दर्जाचे स्पोर्टी लाइफस्टाइल व्हेईकल २०१७ मध्ये बाजारात आले. ब्रॅण्डची जागतिक स्तरावरील सर्व वैशिष्ठ्ये या गाडीत आहेत व ग्राहकांनीही या गाडीचा उत्तम स्वीकार केला. WR-V साठी नवीन V ग्रेड तसेच S व VX ग्रेडची अधिक समृद्ध व्हर्जन्स आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. WR-V श्रेणीमध्ये आलेल्या या नवेपणाला ग्राहकांकडून पसंती मिळेल, याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे.

- Advertisement -

नव्याने आणलेली V ग्रेड डिझेलमध्ये उपलब्ध असून ती S आणि VX ग्रेडच्या मधल्या श्रेणीत आहे. हेडलॅम्प इंटिग्रेटेड सिग्नेचर एलईडी डीआरएल आणि पोझिशन लॅम्प्स, फ्रण्ट फ्रॉग लॅम्प्स, ओआरव्हीएमवर टर्न इंडिकेटर्स, गन मेटल फिनिश असलेली आर१६ मल्टी-स्पोक अलॉय चाके, क्रोम डोअर हॅण्डल्स आणि रिअर मायक्रो अँटेना ही बाह्य रचनेतील सर्व वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स या गाडीमध्ये आहेत.

नवीन श्रेणीमध्ये काळ्या व चंदेरी रंगातील आधुनिक अभिजात अपहोल्स्ट्री असून, १७.७ सेंटीमीटरची अ‍ॅडव्हान्स्ड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट यात एव्हीएनसह आहे. याशिवाय एचएफटीसाठी स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स, ऑडिओ, व्हॉइस कमांड व क्रुझ कंट्रोल, स्वयंचलित हवामान नियंत्रक, पांढर्‍या व लाल इल्युमिनेशनसह वन पुश स्टार्ट/स्टॉप बटण, कीलेस रिमोटसह होंडा स्मार्ट की सिस्टिम, स्टोरेज कन्सोलसह फ्रण्ट सेंटर आर्मरेस्ट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक पॉवर स्टीअरिंग्स (ईपीएस) अशी अनेक प्रगत व आरामदायी फीचर्स यात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -