घरटेक-वेकJioPhone Next: जिओ आणि गुगलच्या भागीदारीतून स्वस्तात मस्त नवा स्मॉर्ट फोन, सप्टेंबरमध्ये...

JioPhone Next: जिओ आणि गुगलच्या भागीदारीतून स्वस्तात मस्त नवा स्मॉर्ट फोन, सप्टेंबरमध्ये मध्ये होणार लाँच

Subscribe

देश २जी मुक्तीकडून तर ५जी युक्त होण्याच्या दिशेने

आज रिलायन्स समुहाची (Reliance Group) ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत मुकेश अंबानी यांनी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली. रिलायन्स जिओने जगातील सर्वात स्वस्त JioPhone Next स्मॉर्टफोन लाँच करण्याची घोषणा करण्यात आली. देशात ३० कोटी लोक स्मॉर्टफोन्स वापरत नाहीत. त्यांच्याकडे आजही बेसिक फोन आहेत. अशा लोकांना आताच्या काळात स्मॉर्टफोन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठीच जिओफोन नेक्स्टची घोषणा करण्यात आली आहे. जिओचा नवी स्मॉर्ट फोन गणपतीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मिळार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर JioPhone Next हा स्मॉर्टफोन बाजारात लाँच करण्यात येणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा फोन जिओ आणि गुगल यांच्या भागीदारीतून तयार करण्यात आला आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे. तर जबरदस्त कॅमेरा देखील या फोन देण्यात येणार आहे. जगातील सर्वात स्वस्त स्मॉर्ट फोन्सपैकी हा एक फोन असल्याचे मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितले. (JioPhone Next: Cheap and cool new smartphone from Jio and Google partnership, to be launched in September)

गेल्या वर्षीच जिओने गुगलसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली होती. आमचे पुढचे ध्येय हे जिओसोबत भागीदारी करुन स्मॉर्टफोन तयार करणे असणार असल्याचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले होते. गुगल क्लाउड आणि जिओ यांच्यात झालेल्या भागीदारीमुळे ५जी टेक्नॉजीसोबत भारतीयांना सर्वात जलद इंटरनेट सुविधा आणि भारतात डिजिटलायझेशन होण्याच्या टप्प्याला चालना मिळणार आहे. देश २जी मुक्त होऊन ५जी युक्त करण्यासाठी भागीदारीत काम सुरु केले आहे. त्यामुळे जिओ आता भारतात केवळ २जी मुक्त नाही तर ५जी युक्त करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

- Advertisement -

JioPhone Next मध्ये काय असतील फिचर्स

JioPhone Next च्या किंमतीविषयी अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार जिओच्या नवीन स्मॉर्टफोनची किंमत फारच कमी असेल. फास्ट स्पीड आणि दमदार ऑपरेटिंग सिस्टीमसोबतच स्वस्त किंमतीत जिओ गुगलचा हा नवीन स्मॉर्टफोन करोडो ग्राहकांसाठी सप्टेंबर महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे. JioPhone Nextमध्ये गुगल अँप्स प्री इन्स्टॉल असतील. ५ ते ५.५ इंचाचा फोन असेल असे सांगण्यात आले आहे. JioPhone Nextमध्ये गूगल लेंस सपोर्ट मिळेल. त्याचप्रमाणे फिल्टर्स कॅमेरा देण्यात येणार आहे. कॅमेरासोबत स्नॅपचॅटचा पर्याय देखील दिला जाणार आहे. तर सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट देण्यात येणार आहे.


हेही वाचा – दमदार बॅटरी आणि फिचर्ससह Lava Benco V80 स्मार्टफोन लाँच, इतकी आहे किंमत

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -