घरटेक-वेक४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला Huawei Y8p स्मार्टफोन लाँच

४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला Huawei Y8p स्मार्टफोन लाँच

Subscribe

Huawei ने कोणताही नवीन कार्यक्रम न करता आपला नवीन स्मार्टफोन Huawei Y8p बाजारात आणला आहे. Huawei Y8p चीनी बाजारात गेल्या वर्षी लाँच झालेल्या Enjoy 10s स्मार्टफोनचं व्हर्जन आहे. कंपनीने सध्या चीनमध्ये Huawei Y8p लाँच केला आहे. Huawei Y8p ब्रीथिंग क्रिस्टल आणि मिडनाईट ब्लॅक या दोन रंगांच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. परंतु कंपनीने अद्याप त्याची किंमत आणि उपलब्धता याबद्दल खुलासा केला नाही.

Huawei Y8p स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Huawei Y8pमध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले आहे. त्याचा स्क्रीन रिझोल्यूशन २४४०x१०८० पिक्सल आहे. यात वॉटरड्रॉप नॉचसह २०:९ अॅस्पेक्ट रेशो आहे. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात 6GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी आहे, जे मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवू शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – २१ मेला लाँच होणार बजेट स्मार्टफोन Moto G8 Power Lite


Android 10 सह EMUI 10.1 वर आधारित Huawei Y8pमध्ये पॉवर बॅकअपसाठी 4,000mAhची बॅटरी आहे. 10W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये Huawei AppGallery देण्यात आली आहे, तर गुगल प्ले स्टोअर नाही आहे. फोटोग्राफीसाठी एआय ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप फोनमध्ये देण्यात आला आहे. यात 48MP प्राइमरी कॅमेरा, 8MPचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. फोनमध्ये 16MPचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -