घरटेक-वेकओपो ए५ भारतामध्ये लाँच

ओपो ए५ भारतामध्ये लाँच

Subscribe

भारतामध्ये नवा ओपो ए५ लाँच करण्यात आला आहे. याची किंमत १४,९९० रुपये इतकी असून जबरदस्त बॅटरी बॅकअप असणारा हा फोन आहे.

ओपोनं भारतामध्ये आपला नवा ओपो ए५ लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये टेक्सर्ड बॅक पॅनल आहे. तसंच ग्लास प्रोटेक्शनसारखे खास फीचर्स आहेत. भारतामध्ये लाँच होत असताना या फोनची किंमत १४,९९० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. दरम्यान हा फोन ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. या फोनकडून कंपनीला खूपच जास्त अपेक्षाही आहेत.

काय खास आहे Oppo A5 मध्ये?

या फोनचा आकार ६.२ इंच असून एचडी प्लस फुलव्ह्यू डिस्प्ले आहे. तर याचं रिझॉल्युशन १५२० X ७२० इतके आहे. तर या फोनच्या समोरच्या भागावर २.५ डी कर्व्हड् ग्लास पॅनल आहे. तर १.८ गीगाहर्ट्ज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४५० SoC clocked प्रोसेसर आहे. त्यामुळं या फोनची गती जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम असून यामध्ये ३२ जीबी अंतर्गत मेमरी आहे. तसंच स्टोरेजसाठी मायक्रो एसडी कार्डमधून तुम्हाला २५६ जीबीपर्यंत ही मेमरी वाढवू शकता.

- Advertisement -

जबरदस्त बॅटरी बॅकअप

यामध्ये तुम्हाला ४२३० अॅम्पियर इतकी बॅटरी आहे, जी जास्त वेळ पुरते असा दावा कंपनीनं केला आहे. यामधील कॅमेरा १३ एमपी + २ एमपी ड्युएल रिअर कॅमेरा आहे. प्रायमरी कॅमेरामध्ये अॅप्रेचर f/2.2 आहेत. तर सेकंडरी कॅमेरा अॅप्रेचर ही f/2.2 इतकाच आहे. दरम्यान फ्रंट कॅमेरामध्ये ८ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. यामध्ये f/2.2 अॅप्रेचर असून २९६ फेशियल पॉईंट यातून ओळखण्याची कॅमेऱ्याची क्षमता आहे. दरम्यान या फोनची कनेक्टिव्हिटी 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n ही असून ब्ल्यूटूथ v4.2, GPS/A-GPS, मायक्रो युएसबी आणि ३.५ मिलीमीटर हेडफोन जॅक समाविष्ट आहे. हा फोन निळा आणि लाल रंगामध्ये उपलब्ध आहे. दरम्यान या फोनची टक्कर ही शाओमी रेडमी नोट ५ प्रो, असूस झेनफोन मॅक्स प्रो एम१, विवो वाय८३, सॅमसंग गॅलेक्सी जे६ आणि नोकीया ६.१ प्लसबरोबर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -