घरटेक-वेकSignal आणि WhatsApp ला टक्कर देतंय 'हे' Messaging App!

Signal आणि WhatsApp ला टक्कर देतंय ‘हे’ Messaging App!

Subscribe

जानेवारी २०२१ मध्ये क्लाऊड आधारित मेसेजिंग अॅप फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला मागे टाकत आहे टेलिग्राम हे अॅप सर्वाधिक डाउनलोड केलेलं नॉन-गेमिंग अॅप्लिकेशन बनले

जानेवारी २०२१ मध्ये क्लाऊड आधारित मेसेजिंग अॅप फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला मागे टाकत आहे टेलिग्राम हे अॅप सर्वाधिक डाउनलोड केलेलं नॉन-गेमिंग अॅप्लिकेशन बनले आहे. जानेवारी २०२१ मध्ये टेलिग्राम अॅपला भारतात चांगलीच पसंती मिळाली असून हे अॅप २४ टक्के भारतीयांनी डाउनलोड केलं आहे. जानेवारी महिन्यात टेलिग्राम हे अ‍ॅप जगभरात ६.३ कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. १.५ कोटी युजर्सने भारतात टेलिग्राम हे अॅप डउनलोड केले, जानेवारी २०२० च्या तुलनेत ३.८ पटीने जास्त टेलिग्राम हे अॅप डाउनलोड करण्यात आले, अशी माहिती सेन्सर टॉवरच्या ताज्या आकडेवारीनुसार मिळतेय.

टेलिग्राम नंतर जानेवारी महिन्यात, टिकटॉक दुसर्‍या क्रमांकावर आहे, त्यानंतर सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्समध्ये सिग्नल तिसऱ्या स्थानी आणि फेसबुक चौथ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपची रँकिंग कमी झाली असून आता ते पाचव्या स्थानावर आहे. यासह टेलिग्राम अ‍ॅप भारतानंतर इंडोनेशियात सर्वाधिक डाउनलोड केले जात आहे. इंडोनेशियामध्ये एकूण डाउनलोडपैकी हे अॅप १० टक्के युजर्सकडून डाउनलोड करण्यात आले आहे. तर जगभरात टिकटॉक ६२ दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहे आणि त्यातील १७ टक्के चीनमध्ये आणि १० टक्के अमेरिकेत डाउनलोड केले गेले आहेत. मागील वर्षी भारतात सरकारने या अ‍ॅपवर बंदी घातली होती. मात्र व्हॉट्सअपच्या प्रायव्हेट पॉलिसीमुळे त्याला नवे पर्याय युजर्सने शोधण्यास सुरूवात केली आहे.

- Advertisement -

२०२० च्या डिसेंबरमध्ये टिकटॉक सर्वाधिक वेळा डाउनलोड केलेल्या अॅप्सपैकी एक अॅप्लिकेशन होते. तर त्यावेळी पहिल्या टॉप ५ अॅप्लिकेशममध्ये टेलिग्रामचा समावेश नव्हता. व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसीचा वाद असल्याने युजर्स इतर मेसेजिंग अॅप्लिकेशनचा आधार घेत आहे. टेलिग्राम अ‍ॅपची क्रेझ जगभरातील लोकांमध्ये वाढताना दिसत असल्याने हे अॅप्लिकेशन सध्या चर्चेत आहे. तसेच, जानेवारी २०२१ मध्ये, सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अॅप्लिकेशनपैकी इंस्टाग्राम सहाव्या क्रमांकावर तर झूम सातव्या क्रमांकावर आहे. यासह आठव्या क्रमांकावर एमएक्स टका टक, नवव्या क्रमांकावर स्नॅपचॅट आणि दहाव्या क्रमांकावर मेसेंजरचा समावेश आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -