घरटेक-वेकऑगस्टपासून Twitter आणि Facebook संबंधित 'हे' 3 नियम बदलणार, जाणून घ्या डिटेल्स

ऑगस्टपासून Twitter आणि Facebook संबंधित ‘हे’ 3 नियम बदलणार, जाणून घ्या डिटेल्स

Subscribe

Twitter आणि Facebook युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण Twitter आणि Facebook संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहे. याच थेट परिणाम Twitter आणि Facebook युजर्सवर होईल. हे बदल ३ ऑगस्टपासून सुरु होतील. यात Twitter Fleet सेवा बंद होईल तर Facebook Payment सर्विसमध्ये विस्तार केला जाणार आहे. याशिवाय Galaxy स्मार्टफोनसाठी एक नवीन सिक्योरिटी अपडेट आणले जाणार आहे. जाणून घेऊ नेमके काय बदल होणार आहेत.

Twitter Fleet सेवा

ट्विटरने ३ ऑगस्टपासून आपली लोकप्रिय Fleet सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी जून २०२० मध्ये ट्विटरने फ्लीट्स फीचर लॉन्च केले होते. पण एका वर्षातच Twitter Fleets बंद होणार आहेत. Fleets वर पोस्ट केलेले फोटो किंवा मेसेज २४ तासांपर्यंत उपलब्ध राहतात. Twitter Fleets फीचर Facebook च्या Story फीचर आणि WhatsApp स्टेटसच्या स्पर्धेत सादर करण्यात आले होते. परंतु Twitter हे Fleets हे फीचर Facebook आणि WhatsApp च्या फिचर्सशी ठक्कर देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

- Advertisement -

Facebook पेमेंट

ऑगस्ट २०२१ पासून Facebook ऑनलाईन रिटेलर्ससाठी पेमेंट सिस्टमचा विस्तार करणार आहे. जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने स्वतःची पेमेंट सिस्टम सुरू केली आहे. यावर फेसबुक मेन साइट आणि मेसेंजरच्या रुपात दिसून येईल. तसेच लवकरच फेसबुकच्या सहाय्यक कंपन्या WhatsApp आणि Instagram वरही Facebook payment सिस्टम जोडली जाईल. The Verge च्या वृत्तानुसार,Facebook Pay सर्विस कंपनीच्या वेबसाईटशिवाय इतर प्लॅटफॉर्मवरही दिसणार आहे.

सिक्युरिटी अपडेट

Samsung Galaxy A52 स्मार्टफोनला ऑगस्टमध्ये नवीन सिक्युरिटी पॅच अपडेट मिळणार आहे. सध्या हे सिक्युरिटी अपडेट जर्मनी, कझाकिस्तान, रशिया आणि युक्रेनसाठी असेल. तसेच लवकरच अन्य देशांनाही एक नवीन सिक्युरिटी अपडेट मिळेल. नवीन अपडेटनंतर Samsung Galaxy A52 स्मार्टफोन पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. तसेच काही एक्स्ट्रा फिचर्सही मिळणार आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -