घरटेक-वेकतुमचे ट्विटर अकाऊंट बंद तर नाही ना!; असेल तर वाचा...

तुमचे ट्विटर अकाऊंट बंद तर नाही ना!; असेल तर वाचा…

Subscribe

यासंदर्भातील माहिती देणारा हा मेल असून यामध्ये ११ डिसेंबरपर्यंत ज्या युजर्सनी आपले अकाऊंट बंद असेल तर ते साईन-इन करण्यास सांगितले

सध्या सोशल मीडियातील फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि मायक्रो ब्लॉगिंग साईट असणाऱ्या ट्विटरचा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं माध्यम आहे. ट्विटर हे आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असल्याने युजर्स अधिक ट्विटरकडे आकर्षित होतात. मात्र तुमचे ट्विटर अकाऊंट अनेक दिवसांपासून बंद असेल त्याचा तुम्ही वापर करत असाल तर बंद करण्यात येणार आहे. वापरात नसलेले अकाऊंट आणि त्यांच्या होल्डर्सना ई-मेल पाठवत आहे.

असा आहे ई-मेल

गेल्या सहा महिन्यांपासून साईन-इन केलेले नाहीत ते ट्विटर अकाऊंट पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय ट्विटरकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती देणारा हा मेल असून यामध्ये ११ डिसेंबरपर्यंत ज्या युजर्सनी आपले अकाऊंट बंद असेल तर ते साईन-इन करण्यास सांगितले आहे. जर युजर्सने आपले अकाऊंट्स साईन-इन केले नाही तर ते अकाऊंट बंद करण्यात येणार असून त्या अकाऊंटचे युजर नेम दुसऱ्या युजर्सना देण्यात येणार आहे.

- Advertisement -

ट्विटरचा वापर मिळावा हा ट्विटरचा उद्देश

युजर्सना उत्तम सेवा पुरवण्यासाठी तसेच अनेक युजर्सनी ट्विटरचा वापर करावा या उद्देशाने अॅक्टिव्ह नसलेले अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय घेणार असून त्याचे अकाऊंट्स बंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ट्विटर्सच्या युजर्सना चांगली सेवा देण्यासाठी असा निर्णय ट्विटरकडून घेण्यात आल्याचे ट्विटरच्या एका प्रवक्त्य़ांनी सांगितले आहे.

मात्र, हे ट्विटरचे इनअॅक्टिवेट असलेले अकाऊंट कधी बंद करण्यात येणार हे सध्या तरी सांगण्यात आलेले नाही. हे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची प्रक्रिया एका दिवसांत ट्विटर सुरू करणार नसून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ साईन-इन न केलेले अकाऊंट असणाऱ्यांना ट्विटरकडून युजर्सकडून एक मेल पाठवण्यात येणार आहे.


आता ट्विटरवर शेड्यूल करता येणार पोस्ट; असं असेल नवं फीचर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -