Eco friendly bappa Competition
घर ठाणे thane ठाण्यात 160 किलो वजनाच्या आजीबाई बेडवरून पडल्या; आणि...

ठाण्यात 160 किलो वजनाच्या आजीबाई बेडवरून पडल्या; आणि…

Subscribe

ठाणे : ठाण्यात 160 किलो वजनाच्या आजी रात्री झोपेतून बेडवरून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने आजींना कोणतीही दुखापत झाली नाही. या आजींचे नाव छाया शंकर वर्तक असे आहे. अजींचे वय 62 वर्ष आहे. आजींना जमिनीवर बेडवर ठेवण्यासाठी सात ते आठ आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना पुन्हा बेडवर सुरक्षितपणे उचलून ठेवले. हा संपूर्ण प्रकार आज सकाळी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

या आजी ठाण्यातील घोडबंदर रोड येथली वाघबीळ या परिसरातील विजय नगरी एनेक्स सोसायटीच्या इमारतीत राहतात. या आजी बुधवारी रात्रीच्या सुमारास झोपेत असताना बेडवरून खाली पडल्या होत्या. याबाबत प्रसाद वर्तक यांना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. या आजींना उचलून पुन्हा बेडवर सुरक्षित ठेवले.

- Advertisement -

हेही वाचा – Dahihandi festival : मुंबई महापालिका रुग्णालांची तयारी; 125 खाटा अन् वैद्यकीय उपचारांची व्यवस्था

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -