Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे अभिनेत्रीच्या मातापित्याने शेतकर्‍यांची जमीन हडपली

अभिनेत्रीच्या मातापित्याने शेतकर्‍यांची जमीन हडपली

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे आई-वडिल तसेट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे सासू आणि सासरे यांनी शहापूर तालुक्यातील गरीब शेतकर्‍याची जमीन हडप करून फसवणूक केली असल्याची घटना समोर येत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे आई-वडिल तसेट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे सासू आणि सासरे यांनी शहापूर तालुक्यातील गरीब शेतकर्‍याची जमीन हडप करून फसवणूक केली असल्याची घटना समोर येत आहे. अनुष्का शर्मा व विराट कोहली या बड्या स्टार सेलिब्रिटींच्या नावाने सरकारी यंत्रणा अवैध पायघड्या अंथरत असल्याने तसेच कुटुंबाची प्रचंड उपासमारीमुळे परवड झाल्याने सामुहिक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी कुटुंबाने जाहीर केले आहे. या संदर्भात शहापूर तहसीलदार निलीमा सुर्यवंशी यांनी तातडीने दहागाव येथील शेतकरी भगवान बजाज जमीन हडपण्याप्रकरणी वासिंद मंडल निरीक्षक यांना अहवाल सादर झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मुंबई नजीकच्या ठाणे जिल्ह्यातील शेतजमिनी धनाढ्य व्यापारी, गर्भश्रीमंत राजकीय नेते, बडेबडे सिनेकलाकार यांनी फार्महाऊससाठी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. शेतकरी कुटुंबांना किरकोळ रक्कम देऊन त्यांच्या जमिनी दलालांमार्फत घेऊन आपल्या मर्जीने सरकारी यंत्रणेच्या संगनमताने कागदपत्रात हेराफेरी करून शेतकर्‍यांना फसवत आहेत. दहागाव येथील भगवान लालचंद बजाज यांची वडिलोपार्जित शेती अनुष्का शर्माचे आई-वडिल अशीमा व अजयकुमार शर्मा यांनी खरेदी केली. एकाच शेतातील पाच एकर जमीन खरेदी विक्री करताना पारंपरिक वहिवाट रस्ता शेती तसेच पीक घेण्यासाठी मोकळा ठेवावा, असे नोंदणी व शासकीय नकाशामध्ये नमूद केले होते. तसे अशीमा अजयकुमार शर्मा यांनी शेतकरी कुटुंबांना लेखी कबुलही केले होते.

- Advertisement -

त्यानंतर, शेतकरी कुटुंबांना वार्‍यावर सोडत जमीन हडप करून त्यांच्या शेतात जाणारा रस्ता बंद केला. भल्या मोठ्या सिमेंटच्या भिंतीचा अडथळा निर्माण करण्यात आला. त्या कुटुंबाने ठाणे जिल्हाधिकरी, लोकशाही दिनात, भूमी अभिलेख, वासिंद व शहापूर पोलीस यंत्रणा यांच्याकडे लेखी कैफियत मांडली. मात्र, बड्या सेलिब्रिटींच्या नावाने हतबलता व पदरी निराशाच शेतकरी कुटुंबांला मिळाली. यामुळे दरवर्षी दुबार पीक घेणार्‍या शेतकरी भगवान लालचंद बजाज यांना पीक घेता न आल्याने संपूर्ण कुटुंबांची आर्थिक होरपळ झाली. त्यातच, नव्याने अतिउच्च दाबाच्या वीज डीपी व धोकादायक वीजपुरवठा वाहिन्या भगवान लालचंद बजाज यांच्याच शेतासमोर बिनदिक्कत उभारल्या. शहापूर उपकार्यकारी अभियंता कटकवार यांनी संवेदनशील अशा सरकारी भातसा कालवा धरण यांच्या पूर्व परवानगीशिवाय अति उच्च दाबाच्या वीज खांब कंत्राटदार व सुरक्षारक्षक सोबतीला घेऊन जबरदस्तीने रोवले आहेत. यावेळी अनेक शेतकर्‍यांनी हरकत घेतली. बड्या सेलिब्रिटीसाठी आमच्या शेतजमिनीचा व सरकारी कालवा जमिनीचा बेकायदेशीर वापर करत असल्याचा जाब दहागावचे शेतकरी दिलीप दगडू काठोळे यांनी विचारला. शेकडो शेतकरीचा रोष पाहून हे धोकादायक काम तेथील कंत्राटदारने तात्पुरते स्थगित केले आहे.

दोन दिवसांपूर्वी शहापूर तहसीलदार यांची शेतकरी भगवान लालचंद बजाज यांनी भेट घेतली. शेतीपासून दुरावल्यामुळे कुटुंबियांची मानसिकता ढासळत चालली आहे. उपासमार होत असल्याने सामुहिक आत्महत्येटा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. या फसवणुकीप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे लेखी स्वरूपातील पत्र संबंधीत यंत्रणांना दिले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

– संजय सुरळके (लेखक शहापूर प्रतिनिधी आहेत.)

हेही वाचा –

पवारांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजेंचा इशारा

- Advertisement -