घरठाणेचोवीस तासात जिल्ह्यात दुप्पटीने कोरोना रुग्ण संख्येत वाढ

चोवीस तासात जिल्ह्यात दुप्पटीने कोरोना रुग्ण संख्येत वाढ

Subscribe

 ओमायक्रॉनची ठाण्यात ८ जणांना लागण

गेल्या चोवीस ठाणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. मंगळवारी जिल्ह्यात साडेतीन हजार रुग्ण आढळून आले असून यामध्ये ठाणे आणि नवी मुंबई येथील रुग्ण संख्या ही तीन आकडी आहे. या वाढत्या रुग्ण संख्येने सक्रिय रुग्णांची संख्या ही ७ हजार २९५ इतकी झाली आहे. मात्र दिवसभरात एकही जण दगावला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली.

परदेशातून ठाणे शहरात आलेल्या ८ जणांना मंगळवारी ओमायक्रॉनची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट आले आहे.ओमायक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांमध्ये पाच जण महिला असून तिघे पुरुष आहेत. ६ जणांवर पार्किंग प्लाझा आणि दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सिंगापूर आणि शारजा येथून प्रत्येकी तिघे तर लंडन आणि दुबई येथून प्रत्येकी एक जण आलेला आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात तीन हजार ५०२ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ही ५ लाख ८३ हजार २७६ वर पोहोचली आहे. तर दगावणाऱ्यांची संख्या  ११ हजार ६२१ वर स्थिरावली आहे. ठाणे शहरात १ हजार ३३२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही २ हजार ७० वर गेली आहे. त्यापाठोपाठ नवीमुंबईत १ हजार ७२ रुग्ण नोंदवले गेले असून तेथे २ हजार ३७९ सक्रिय आहेत. कल्याण-डोंबिवलीत ४२२ रुग्ण आढळून आले असून ९४८रुग्ण सक्रिय आहे.मीरा भाईंदर मध्ये ३८७  रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १३९ वर पोहोचली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १५१ रुग्णांची नोंदणी झाली असल्याने सक्रिय रुग्ण संख्या २६३ वर गेली आहे. उल्हासनगरात ५२ रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्ण संख्या ही २२३ झाली आहे. कुळगाव बदलापूर, अंबरनाथ आणि भिवंडीत अनुक्रमे ४२,२९ आणि १५ रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्ण ही अनुक्रमे ७४,१४२ आणि ५७ इतकी आहे. तर दिवसभरात एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ७५ हजार नागरिकांचे लसीकरण
ठाणे । कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार मंगळवारी सायंकाळी सातपर्यंत ७५ हजार ८९३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ११ लाख ४३ हजार ४५५ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६३ लाख ६० हजार ८८६ नागरिकांना तर ४७ लाख ८२ हजार ५६९ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४९१ सत्र आयोजित करण्यात आले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -