घरठाणेसंभाजी भिडेंविरोधात महिला पत्रकार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

संभाजी भिडेंविरोधात महिला पत्रकार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

Subscribe

ठाण्यातील महिला पत्रकारांनी #माझीटिकली #माझीमर्जी हा hashtag सोशल मीडियावर सुरू केलेला आहे आणि भारतातील सर्व महिला पत्रकारांनी देखील ह्यात सहभाग घेत भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करावा असे आवाहन देखील केले.

ठाणे – टिकली संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केवळ महिला पत्रकारांचीच (Female Reporters) नव्हे तर समस्त महिलांची माफी मागावी, अशी मागणी शुक्रवारी ठाणे महिला पत्रकारांनी केली. यासंदर्भाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले असून हे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले. टिकलीवरून सध्या सर्व स्तरातून मतमतांतरे व्यक्त होत असताना राज्यात सर्वप्रथम ठाण्यातील महिला पत्रकारांनी आपली भूमिका स्पष्ट करत संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – अमृता फडणवीस महाराष्ट्राच्या वहिनी आहेत, त्यांनीही कुंकू लावलं पाहिजे; भिडेंविरोधात पुण्यात आंदोलन

- Advertisement -

बुधवार २ नोव्हेंबर २०२२ रोजी मंत्रालयात एक महिला पत्रकार संभाजी भिडे यांना प्रश्न विचारत असताना ‘तू आधी कुंकू लावून किंवा टिकली लावून ये, मग तुझ्याशी बोलेन. स्त्री ही भारतमाता आहे आणि भारतमाता विधवा नाही, असे वक्तव्य केले. पुरोगामी महाराष्ट्रात असे वक्तव्य करणे ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्य बाब आहे. एखाद्या महिलेने टिकली लावावी की नाही, हा संपूर्णपणे तिचा वैयक्तिक अधिकार आहे. भारतीय संविधानाने नेहमीच स्त्रीचा आदर राखला आहे. अशावेळी संभाजी भिडे यांचे वक्तव्य समस्त महिलांचा अपमान करणारे आहे. ठाणे महिला पत्रकारांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

हेही वाचा सुषमा अंधारेंचे ‘प्रबोधन’ करण्यासाठी मलाच जावे लागेल; तृप्ती देसाईंचा टोला

- Advertisement -

टिकली लावावी की नाही हा प्रत्येक महिलेचा वैयक्तिक प्रश्न आहे. कपाळावरील टिकली टिकण्यापेक्षा महिलेची अस्मिता टिकणे गरजेचे आहे. सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्यामुळे कर्तुत्व बघितलं गेलं पाहिजे, असे मत महिला पत्रकारांनी व्यक्त केले. तसेच अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी जाहीर माफी मागावी आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही अशी दखल घ्यावी अशी मागणी महिला पत्रकरांकडून करण्यात आली आहे.

आपला निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी महिला पत्रकारांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदन देखील दिले आहे. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार सहकारी तसेच डिजिटल मीडियाचे सदस्य ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाण्यातील महिला पत्रकारांनी #माझीटिकली #माझीमर्जी हा hashtag सोशल मीडियावर सुरू केलेला आहे आणि भारतातील सर्व महिला पत्रकारांनी देखील ह्यात सहभाग घेत भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करावा असे आवाहन देखील केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -