घरठाणेपोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा मृत्यू

पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा मृत्यू

Subscribe

डोंबिवलीतील खळबळजनक घटना

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत अटक असलेल्या एका आरोपीचा मृत्यू झाला. दत्तात्रय वारके असे मृत आरोपीचे नाव असून त्याला फिट आल्याने तो प्रथम बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका महिलेसोबत अश्लील संभाषण केल्या प्रकरणी दत्तात्रेय वारके याला अटक करण्यात आली होती.

दत्तात्रेय हा एका बिल्डरकडे कामाला होता. २०१३ मध्ये घर विकत देण्यासाठी त्याने एका महिलेकडून पाच लाख रुपये घेतले, मात्र या महिलेला तो घर देत नव्हता आणि पैसे देखील परत करत नव्हता. यासंदर्भात महिलेने वारंवार दत्तात्रयकडे तगादा लावला, मात्र दत्तात्रेय काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एके दिवशी फोनवर त्याने महिलेसोबत अश्लील संभाषण केल्याचा दावा केला जातो.याबाबत संबंधित महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात व मानव अधिकारासह इतर ठिकाणी सुद्धा तक्रारी दिल्या होत्या. महिलेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी ५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी त्याला जळगावहून अटक करण्यात आली होती. त्यानंतर कल्याण कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

- Advertisement -

आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आधी कोविड रिपोर्ट बंधनकारक असल्याने मानपाडा पोलिसांनी दत्तात्रेय याची कोविड चाचणी करून त्याला पोलीस स्टेशनच्या आयसोलेशन रूममध्ये ठेवले होते. पोलिस त्याच्या कोव्हीड रिपोर्टच्या प्रतीक्षेत होते. मात्र सोमवारी पहाटे त्याला फीट आल्याने तो बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दत्तात्रेय याचे कुटुंब भुसावळला राहते. फीट आल्याने दत्तात्रेयचा मृत्यू झाल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला दिली आहे. तसेच त्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला असून डॉक्टरांच्या पॅनल खाली त्याचे शवविच्छेदन होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -