घरठाणेडोंबिवलीत भाजपाच्या फलकाला काळे फासले

डोंबिवलीत भाजपाच्या फलकाला काळे फासले

Subscribe

दोघांना अटक

डोंबिवली । भारतीय जनता पक्षाच्या वतीने डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरातील खासगी, सार्वजनिक संरक्षित भिंतीवर येत्या लोकसभा निवडणुकीचा भाग म्हणून पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ काढत जाहिराती करण्यात आल्या आहेत. या ‘कमळ’ चिन्हावर काही लोकांनी काळे फासल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारी नुसार विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिंदे गटाचे समर्थक सम्राट मगरे, विशाल कोकाटे यांना अटक केली आहे.

या प्रकरणात सम्राट हा मुख्य आरोपी असून तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे महायुतीमधील भाजप-शिवसेना या मित्र पक्षातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजप केंद्र सरकारच्या कार्यक्रमाप्रमाणे डोंबिवलीतील भाजप पदाधिकार्‍यांनी डोंबिवलीत ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ आणि त्याच्या बाजुला भाजपचे कमळ चिन्ह अशा स्वरूपाच्या जाहिराती सार्वजनिक, खासगी ठिकाणच्या भिंती, संरक्षक भिंतीवर काढून भाजपची प्रचार मोहीम सुरू केली आहे. शनिवारी सकाळी कोपर येथील भाजपचे कार्यकर्त्यांनी काढलेल्या सर्वच कमळ चिन्हांवर काळे फासले असल्याचे दिसले. यासंबंधी त्यांनी पक्षातील वरिष्ठांना त्याची माहिती दिली. पक्षातील वरिष्ठांच्या माहितीवरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. दाखल तक्रारीवरून विष्णूनगर पोलीस पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात दोन जण हा प्रकार करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत मगरे याला शनिवारी सकाळी अटक केली. तर सायंकाळी कोकाटे याला अटक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे हे दोघे शिंदे समर्थक असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -