घरक्राइममित्रांसोबत फिरायला गेला, पण एक डुबकी जीवावर बेतली; खदाणीत पडून तरुणाचा मृत्यू

मित्रांसोबत फिरायला गेला, पण एक डुबकी जीवावर बेतली; खदाणीत पडून तरुणाचा मृत्यू

Subscribe

ठाणे : सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेक तरुणाई मौजमजेसाठी ट्रेकींगसाठी किंवा एखाद्या धबधब्या ठिकाणी फिरायला जाते. पण अनेकदा त्यांचा अतिउत्सात त्यांच्या जीवावर बेतल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. कल्याण डोंबिवली  जवळील ग्रामीण भागात असलेल्या खदानींनी अनेकांचे जीव घेतले आहे. आता पुन्हा एकदा तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Went for a walk with friends but a dive took his life Youth dies after falling into quarry)

हेही वाचा – धक्कादायक : क्रिकेटच्या मैदानात खेळताना खाली कोसळला; 20 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

- Advertisement -

कल्याण डोंबिवली जवळील म्हारळ गावातील खदानी जवळ असलेल्या धबधब्यावर एक तरुण आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला होता. यावेळी त्याला पोहायला येत नसतानाही त्याने पाण्यात उडी मारली आणि पुन्हा बाहेर आलाच नाही. खदानीत डुबकी घेताच तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (14 जुलै) संध्याकाळी चार वाजता घडली.  उमेश अंबादास सोनवणे असे मयत तरुणाचे नाव आहे. तो म्हारळ गावातील क्रांतीनगर मध्ये राहत होता.

उमेश सोनवणे हा आपल्या 7 – 8 मित्रांबरोबर शुक्रवारी संध्याकाळी म्हारळ गावातील खदानी जवळ असलेल्या धबधब्यावर फिरायला गेला होता. यावेळी तिथेच खाली असलेल्या खदानमध्ये टीशर्ट धुवून एक डुबकी मारून येतो, असे आपल्या मित्रांना सांगून निघून गेला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याने पोहता येत नसतानाही पाण्यात उडी मारल्याने तो बुडू लागला. यावेळी त्याच्या मित्रांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांनी दोरी फेकली, पण उमेश बुडत होता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी उल्हासनगर अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. पण ती हद्द आमची नाही, असे अग्निशमक दलाकडून सांगण्यात आले. बराच वेळाने अग्निशमक दलाने त्याठिकाणी येऊन उमेशला शोधण्यासाठी गळ टाकला, पण त्याला शोध लागला नाही. अंधार झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – गुंतवणूक, शिक्षणात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? अधिवेशनापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता उल्हासनगर व कल्याण अग्निशमन विभागाच्या जवानांनी स्पीड बोटच्या साहाय्याने उमेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. उमेशच्या मृत्यूने म्हारळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. खदान परिसरात नागरकि फेरफटका मारण्यासाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात म्हारळ ग्रामपंचायतीने पोहण्या मनाई असे सूचना फलक लावावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -