घरट्रेंडिंगबायकोला घाबरून लग्नासाठी कॉन्स्टेबलने मागितली सुट्टी, अर्ज झाला व्हायरल

बायकोला घाबरून लग्नासाठी कॉन्स्टेबलने मागितली सुट्टी, अर्ज झाला व्हायरल

Subscribe

बायकोचा शब्द झेलता झेलता पठ्या आपली चांगल्या पगाराची नोकरी घालवून बसला आहे. त्याच्या सुट्टीचा अर्जही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अर्ज वाचून अधिकाऱ्यांनाही हसू आले.

या जगात बायकोला सगळेच घाबरत असतात. बायकोने सांगितलेला शब्द नवऱ्यांला काही करून झेलावाच लागतो. पण बायकोचा शब्द झेलता झेलता नवऱ्याला आपली चांगली नोकरी गमावून बसवी लागली तर? असाच एक प्रकार मध्य प्रदेशमधून समोर आला आहे. बायकोचा शब्द झेलता झेलता पठ्या आपली चांगल्या पगाराची नोकरी घालवून बसला आहे. त्याच्या सुट्टीचा अर्जही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अर्ज वाचून अधिकाऱ्यांनाही हसू आले.

मध्य प्रदेश भोपाळ येथे राहणाऱ्या दिलीप नावाच्या एका पोलीस कॉन्स्टेबलने सुट्टी मागितली. त्यासाठी त्याने सुट्टीचा अर्जही दिला. त्याच्या सु्ट्टीचा अर्ज वाचून वरिष्ठ अधिकारीही हैराण झाले. या अर्जात पोलीस कॉन्स्टेबलने असे लिहिले होते की, मी माझ्या बायकोला खूप घाबरतो. माझ्या मेहुण्याचे लग्न आहे. त्यासाठी मला ५ दिवसांची सु्ट्टी हवी आहे. प्लिज मला सुट्टी द्या,सुट्टी नाही दिली तर माझी बायको मला सोडून जाईल. तिने मला धमकी दिली आहे की, जर सुट्टी घेऊन माझ्या भावाच्या लग्नाला नाही आलात तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. त्यामुळे प्लिज मला ५ दिवसांची सु्ट्टी द्या असे त्याने अर्जात लिहिले होते. हे पत्र वाचून वरिष्ठ अधिकारीही हैराण झाले.

- Advertisement -

या पोलीस कॉन्स्टेबलचे सुट्टीचे अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ११ डिसेंबरला कॉन्स्टेबल दिलीपने पाच दिवसांची सुट्टी मागितली. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची सुट्टी मंजुर केली नाही. दिलीपने याआधी ९० दिवसांपेक्षा जास्त दिवसांची सुट्टी घेतल्याने पुन्हा सुट्टी नाकारण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अर्जाची भाषा उचित वाटली नाही त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबला ड्युटीवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कॉन्स्टेबल दिलीपला मेहुण्याच्या लग्नासाठी सुट्टी काही मिळाली नाही. पण कॉन्स्टेबला आपली चांगली नोकरीही गमवावी लागली आहे. त्याचबरोबर त्याचा अर्जही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक; वाढदिवसाचे आमंत्रण देऊन मित्राने केला तिच्यासमोर नग्न डान्स!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -