घरट्रेंडिंगइsss... या महिलेच्या दातांमध्ये उगवत आहेत केस

इsss… या महिलेच्या दातांमध्ये उगवत आहेत केस

Subscribe

आपल्या शरीराच्या अनेक भागांवर केस येतात. नैसर्गिक गोष्ट आहे ती. पण काही भाग असे आहेत जिथं कधीही केस येण्याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. जसे की, नखं, दात, तळहात, तळपाय अशा ठिकाणी केस आलेले आपण कधी पाहिले किंवा ऐकले नसेल. पण इटलीमधील एक महिला एका वेगळ्याच किंवा असं म्हणा भलत्याच आजाराने ग्रासली आहे. या महिलेच्या चक्क दातांमध्ये केस उगवत आहेत. बरं दातांमध्ये केस येण्याची ही तिची काही पहिली वेळ नाही. सहा वर्षांपूर्वी देखील तिला या समस्येने भेडसावले होते. त्यावेळी ऑपरेशन करुन हे केस काढून टाकण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा दातांमध्ये केस उगवल्यामुळे ही महिला त्रस्त झाली आहे.

या महिलेला जो आजार आहे, त्याचे नाव Gingival Hirsutism असे आहे. पहिल्यांदा जेव्हा ही महिला डॉक्टरकडे आपली समस्या घेऊन गेली होती. तेव्हा तिच्या हनुवटी आणि गळ्यावर देखील केस आढळून आले होते. या महिलेच्या वरच्या बाजूच्या दोन दातांदरम्यान भुवया इतके बारीक केस उगवले होते. पहिल्यांदा हे केस ऑपरेशन करुन काढून टाकण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा केस उगवल्यामुळे डॉक्टर देखील चक्रावून गेले आहेत.

- Advertisement -

जेवण केल्यानंतर आपल्या दातात काही अडकलं असल्यास आपल्याला चैन पडत नाही. पाण्याचा गुळणा करुन किंवा काडीने दात टोकरुन आपण कधी दातात अडकलेलं अन्न काढतोय, असं होतं. मग विचार करा या महिलेच्या दातात चक्क जर केस उगवत असतील तर जिभेला लागून ते तिला किती मानसिक त्रास देत असतील.

डॉक्टरांच्या मतानूसार ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. महिलेच्या तोंडाच्या आता केस का येतायत? याचे कोणतेही कारण कळत नाहीये. जेव्हा डॉक्टरांनी अशाप्रकारच्या इतर प्रकरणांचा तपास केला तेव्हा जगभरातून केवळ पाच प्रकरणे समोर आली आहेत. मात्र त्यामध्ये तोंडात एकच केस आल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -
hair in gums
छायाचित्र साभार – Oral Surgery, Oral Medicine, Oral Pathology and Oral Radiology

सायन्स अलर्ट या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिलेले आहे. Oral Surgery, Oral Medicine, Oral Pathology and Oral Radiology या अहवालात या महिलेच्या केसचा दाखला देण्यात आला आहे. जेव्हा पहिल्यांदा ही महिला उपचार घेण्यासाठी आली होती, त्यावेळी तिचे केस काढून टाकत हार्मोन्सला नियंत्रित करणारी औषधे डॉक्टरांनी दिली होती. मात्र काही वर्षांनी महिलेने औषधे घेण्याचे थांबविल्यामुळे पुन्हा एकदा तोंडात केस उगवले आहेत. यावेळी पुन्हा एकदा डॉक्टरांनी या महिलेचे केस काढून टाकले आहेतच, त्याशिवाय केस उगविणाऱ्या ठिकाणच्या हिरड्यातील छोटासा पापुद्राही काढला आहे. मात्र या महिलेला नक्की हा आजार कशामुळे झालाय? हे मात्र कळू शकलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -