घरट्रेंडिंग'ही' कंपनी झोपण्यासाठी कर्मचाऱ्यांना देते बक्षीस

‘ही’ कंपनी झोपण्यासाठी कर्मचाऱ्यांना देते बक्षीस

Subscribe

आपल्याला पुरेशी झोप मिळाली नाहीतर आपले काम नीट करता येत नाही. अर्धवट झोप झाली असेल तर कामाच्या ठिकाणी चिडचिड होणे, छातीत जळजळ होणे, आळस येणे, डोळ्याची पापण्या बंद होणे असे त्रास होतात. त्यामुळे कर्मचारी नीट काम करु शकत नाहीत. हीच गोष्ट एका कंपनीने हेरली आहे. जे कर्मचारी किमान सहा तासांची झोप पूर्ण करतात, अशा कर्मचाऱ्यांना कंपनीने जादा पगार देऊ केला आहे. कझुहिको मोरियामा यांची एक एक विवाह संस्था आहे. या विवाह संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी ही विशेष योजना राबवली आहे.

अशी आहो योजना

आठवड्यातील किमान ५ दिवस दररोज ६ तासांची झोप पूर्ण करतील, अशा कर्मचाऱ्यांना ठरावीक गुण दिले जातात. या गुणांनुसार त्याला ६४ हजार येन (जपानी चलन) (५७० डॉलर्स = ४१ हजार ९२३ रुपये) इतका जादा पगार दिले जातात. हे पॉईंट्स कार्यालयातील कॅफेमध्येदेखील वापरता येतात .फुजी ऱ्योकी या आरोग्य उत्पादने तयार करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार जपानमधील २० वर्षांवरील ९२ टक्के नागरिक पूर्ण झोप घेत नाहीत. जपानी लोकांच्या याच सवयीमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जपानमधील मृत्यूदरदेखील वाढला आहे. पूर्ण वेळ झोप झाली तर कर्मचारी चांगले काम करु शकतातच परंतु त्यांचे वैयक्तिक आयुष्यदेखील सुंदर होऊ शकते असा निश्कर्ष या सर्वेक्षणाअंती काढण्यात आला. यामधून धडा घेत कझुहिको मोरियामा यांना ही आगळी-वेगळी योजना सुचली आणि त्यांनी ती त्यांच्या कंपनीत आंमलात आणली आहे.

- Advertisement -

मोरियामा याबाबत म्हणाले की, कामगारांच्या कायद्याचे रक्षण करायला हवे. जर तसे केले नाही, तर देशाला खूप मोठ्या समम्या उद्भवतील. आतापर्यंत असे अनेकदा घडले आहे की, ज्या कंपन्यांमध्ये कर्मचारी पूर्णवेळ झोप घेतात. त्या कंपन्यांची आर्थिकदृष्ट्या भरभराट झाली आहे. योग्य झोपेमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला ४११ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा फायदा होतो. देशाचा २.२८ टक्के जीडीपी त्यामुळेच वाढला आहे. त्याउलट जपानची परिस्थिती आहे. जपानला मात्र दरवर्षी १३८ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतके नुकसान झाले आहे. ज्यामुळे जपानचा जीडीपी २.९२ टक्क्यांनी घसरला आहे. मोरियामा याबाबत म्हणाले की, मला १० लाख कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचायचे आहे. माझ्यामुळे इतरही लोक असे फंडे आमलात आणतील व कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजना राबवतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -