घरट्रेंडिंगहा पाहा प्रभादेवीत स्टंट केलेल्या 'स्टंटमॅन'चा संपूर्ण व्हिडिओ

हा पाहा प्रभादेवीत स्टंट केलेल्या ‘स्टंटमॅन’चा संपूर्ण व्हिडिओ

Subscribe

प्रभादेवी रेल्वेस्थानकाच्या बाहेर स्टॉरर (STORROR) नावाचा परदेशातील एका ग्रुपने हा भयानक स्टंट केला होता. या स्टंटमधील काही भाग लीक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने या पर्यटकांना ताब्यात घेतले होते.

काही दिवसांपूर्वी प्रभादेवीच्या एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी मारण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या स्टंटने खळबळ माजवल्यानंतर आता या स्टंटमॅनचा संपूर्ण व्हिडिओ युटयबवर आला आहे. हा व्हिडिओ त्यावेळी पाहिल्यानंतर ह्रदयाचा ठोका चुकला होता. पण आता हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची झोप उडाल्यावाचून राहणार नाही हे मात्र नक्की!

पाहा हा संपूर्ण व्हिडिओ


अबब! कसला हा भयानक स्टंट

प्रभादेवी रेल्वेस्थानकाच्या बाहेर स्टॉरर (STORROR) नावाचा परदेशातील एका ग्रुपने हा भयानक स्टंट केला होता. या स्टंटमधील काही भाग लीक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने या पर्यटकांना ताब्यात घेतले होते. पण त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. पण युटयुबवर असलेल्या या ग्रुपचे कामच अशा प्रकारे स्टंट करण्याचे आहे. त्यांनी मुंबईतील अनेक इमारतीवर अशा प्रकारे स्टंट केले आहेत. त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे या ग्रुपने हा व्हिडिओ एडिट करताना भारतातील प्रसारमाध्यमांनी केलेले वार्तांकन देखील दाखवले आहे.

- Advertisement -
तरुणाची जीवघेणी उडी; स्टंटबाजी कॅमेऱ्यामध्ये कैद!

पुढील आठवड्यात आणखी एक व्हिडिओ

हा व्हिडिओ संपताना या ग्रुप भारतातील अनुभवाचा व्हिडिओ देखील शेअर करणार आहे. सध्या तरी या ग्रुपने ३ मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो पाहूनच त्यांच्या या स्टंटचा अनुभव येतो. त्यांच्या चॅनेलवरील अन्य व्हिडिओ हे देखील अशाच प्रकारचे स्टंट आहेत. उंच इमारतीवरुन उडया मारतानाचे अनेक व्हिडिओ तुम्हाला त्यांच्या चॅनेलवर पाहायला मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -