घरट्रेंडिंगकर्नाटक निवडणूक, सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

कर्नाटक निवडणूक, सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

Subscribe

कर्नाटक सत्ता स्थापनेच्या पेचावरून सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडतोय. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी भाजपाने दावा केला. त्यानंतर काँग्रेस – जेडीएसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत भाजपाला सत्तास्थापनेच्या निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिले. कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या या राजकीय नाट्यावर नेटिझन्सने मात्र चांगलेच तोंडसुख घेतले आहे. या सर्व प्रकाराची सध्या सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. शिवाय कोर्टात देखील न्यायाधीश सीक्री यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जोक्सचा दाखला दिला. यानंतर कोर्टात एकच हशा पसरला.

- Advertisement -

- Advertisement -

निवडणुकीच्या धामधुमीत कर्नाटकासह देशातले राजकीय वातावरण जरी तापले असले, तरी सोशल मीडियावर मात्र जोक्सचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे राजकीय उकाड्यात जोक्सची मंद झुळूक मनाला गारवा देऊन जाते हे मात्र नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -