‘या’ व्यक्तीने शंभर खोल्यांमध्ये ३९ बायकांबरोबर थाटलाय संसार!

The world's largest family with 181 members in Mizoram
'या' व्यक्तीने शंभर खोल्यांमध्ये ३९ बायकांबरोबर थाटलाय संसार!

भारतात दीर्घ काळापासून संयुक्त कुटुंब ही परंपरा चालत आली आहे. पण सध्या ती कुठेतरी नाहीशी होताना दिसत आहे. लग्न झाल्यानंतर जोडपी आता आई-वडीलांसोबत जास्त न राहता स्वतंत्र राहताना दिसत आहे. पण भारतातील मिझोरममधील राहणाऱ्या एका कुटुंबाने आजही संयुक्त कुटुंबाची परंपरा कायम ठेवली आहे. या संयुक्त कुटुंबात एक किंवा दोन सदस्य नसून तब्बल १८१ सदस्य राहत आहेत. या कुटुंबाला जगातील सर्वात मोठ्या कुटुंबामध्ये गणले जाते. हे सर्व कुटुंब १०० खोल्यांच्या घरात राहते. इतकं मोठं कुटुंब संपूर्ण दिवस कसा घालवतं ते जाणून घ्या.

मिझोरमातील हे सर्वात मोठं कुटुंब जिओना चाना चालवतात. जिओना यांना ३९ पत्नी आहेत. तसेच त्यांना ९४ मुलं आहेत. या कुटुंबात १४ सूना आणि ३३ नातवंडं आहेत. म्हणजेच या कुटुंबात तब्बल १८१ लोक राहत आहेत.

जिओना आपल्या या मोठ्या कुटुंबासोबत मिझोरमातील बटवंग गावात एका मोठ्या घरात राहतात. आपले कुटुंब चालविण्यासाठी ते आणि त्यांची मुलं सुतार काम करतात. त्याच्या घरात एकूण १०० खोल्या आहेत. इतक्या मोठ्या कुटुंबासाठी मोठ्या घरात एक लहान स्वयंपाकघर देखील आहे. कुटुंबातील महिला सकाळपासून एकत्र जमून १८१ सदस्याचं जेवणं करतात.

घरातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना किरकोळ अडचणींना सामना करावा लागतो. परंतु ते सर्व एकत्र काम करतात. यामध्ये स्वयंपाक आणि घरातील इतर कामांचा समावेश आहे. घरातील महिला फक्त स्वयंपाक करत नसून शेतातही काम करतात. त्यांचा घर चालवण्यासाठी सर्वात मोठा वाटा आहे.

जिओनांची पहिली पत्नी सर्वांमध्ये काम करते आणि प्रत्येकांच्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवते. कुटुंबात असे बरेच लोक आहेत, ज्यांची नावं आणि वाढदिवस लक्षात ठेवणं फार कठीण आहे. पण कोणत्याना कोणत्या पद्धतीने त्याच्या वाढदिवसांच्या तारखा लक्षात असतात, असं कुटुंबातील सदस्य म्हणाले.

जितका शिधा एक कुटुंब दोन महिने वापरतं तितका शिधा या कुटुंबाला एका दिवसासाठी लागतो. एका दिवसात ४५ किलो तांदूळ, २५ किलो डाळी, ६० किलो भाज्या, ३० ते ४० डझनभर अंडी लागतात. याशिवाय संपूर्ण कुटुंब २० किलो फळं खातात. निवडणुकीच्या वेळी या कुटुंबाला खूप महत्त्व दिलं जातं. हे कुटुंब ज्या पक्षाला समर्थन देतं तो पक्ष जिंकतो. इतक्या सदस्यासह राहत असलेल्या या मोठ्या कुटुंबाबद्दल सगळ्यांचं आश्चर्य वाटतं आहे.


हेही वाचा – झोपेत घोरणाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका तीनपट अधिक; संशोधन