घरट्रेंडिंगलहान मुलांसाठी गायीचे की म्हशीचे दूध आरोग्यदायी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

लहान मुलांसाठी गायीचे की म्हशीचे दूध आरोग्यदायी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Subscribe

कॅल्शिअम, प्रोटीन, विटामिन आदी पोषक तत्वे दूधातून लहान मुलांना मिळत असतं, ज्यामुळे लहान मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे गायीचं दूध चांगलं की म्हशीचं चांगलं ते पाहुयात!

आपल्या मुलांना चांगलं आरोग्य लाभावं याकरता प्रत्येक आई-वडिल फार विचारपूर्वक काळजी घेतात. त्यामुळे ते आपल्या मुलांना नेहमीच पौष्टिक अन्नपदार्थ खाऊ घालतात. त्यांच्या खाण्या-पिण्यात अजिबात हयगय केली जात नाही. त्यामुळे अनेकदा लहान मुलांना गायीचं दूध (Milk for children) द्यावं की म्हशीचं या संभ्रमात अनेक पालक असतात. लहान मुलांना दूध हे अत्यंत महत्त्वाचं प्रोटिन मानलं जातं. कॅल्शिअम, प्रोटीन, विटामिन आदी पोषक तत्वे दुधातून लहान मुलांना मिळत असतं, ज्यामुळे लहान मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे गायीचं दूध चांगलं की म्हशीचं चांगलं ते पाहुयात! (which of this cow’s or buffalo’s milk is healthy for children? Find out the opinions of experts)

हेही वाचा – अंबानी ते अमिताभ बच्चन पितात या डेअरीचे दूध; एक लिटर दुधाची किंमत वाचून व्हाल थक्क

- Advertisement -

गायीच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा कमी फॅट (Fat) असतं, ज्यामुळे गायीचं दूध पचायला हलकं जातं. मात्र, गायीचं दूध म्हशीच्या दुधापेक्षा घट्ट असतं. त्यामुळे दही (Curd), पनीर (Paneer), खीर, कुल्फी (Culfi), रसमलाई (Rasmalai) आणि रसगुल्ला (Rasgulla) सारखे दुग्धजन्य पदार्थ गायीच्या दुधापासून बनवले जातात.

तर, दुसरीकडे म्हशीच्या दुधाचा विचार केल्यास त्यामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त प्रोटीन मिळतं. मात्र, म्हशीचं दूध लहान मुलांना पचायला जड जातं. त्यामुळे पहिल्या वर्षांपर्यंत लहान मुलांना गायीचं दूध देणं आरोग्यदायी ठरतं. तर, दुसरीकडे म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा जास्त स्निग्धांश (फॅट) असतात, त्यामुळे ते लहान मुलांना दिलं जात नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Donkey : गाढवाचे मटण अन् दूधही गुणकारी, तरीही महाराष्ट्रासह देशाभरात गाढवांच्या संख्येत मोठी घट

लहान मुलांना गायीचं दूध जास्त प्रमाणात पाजणं चांगलं मानलं जातं कारण हे दूध पचायला हलकं आणि बाळांच्या वाढीसाठी आरोग्यदायी असतं. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा जास्त पोषक तत्व म्हणजेच प्रोटीन, कॅल्शिअम आणि फॅट असतं. त्यामुळे पचण्याच्या बाबतीत म्हशीचं दूध जड जातं. त्यामुळे ते लहान मुलांसाठी आरोग्यदायी नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे लहान मुलांसाठी म्हशीच्या दुधापेक्षा गायीचं दूध पाजणं चांगलं असतं.

हेही वाचा – नासलेले दूध वापरून बनवा ‘हे’ टेस्टी पदार्थ

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -