घरट्रेंडिंगअबब! ड्रग्जची तस्करी करण्यासाठी केलं गर्भवती असल्याचं ढोंग

अबब! ड्रग्जची तस्करी करण्यासाठी केलं गर्भवती असल्याचं ढोंग

Subscribe

गर्भवती असल्याचं ढोंग करत तस्करी करणाऱ्या अर्जेंटिनाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

जगभरात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी तस्कर अनेक निरनिराळे पर्याय शोधून काढतात. कपड्यांमधून, बॅगेमधून, खाद्य पदार्थांमधून असे अनेक पर्याय काढून ड्रग्जची तस्करी केली जाते. तर अर्जेंटीनातील एका महिलेनं ड्रग्जची तस्करी करण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली. तिनं चक्क गर्भवती होण्याचं ढोंग करून तिच्या वाढलेल्या पोटातून गांजा नावाच्या ड्रग्जच्या १५ पुड्यांची तस्करी केली. मात्र पोलीस तिला पकडण्यात आणि अटक करण्यात यशस्वी ठरले. ही महिला अर्जेंटिनातल्या मेंडोजा ते सांताक्रूझ पर्यंत प्रवास करत होती. तिच्या वाढलेल्या पोटात गांजाच्या १५ पुड्या आढळल्या. ही सगळी माहिती अर्जेंटिनामधील सुरक्षा मंत्री पॅट्रसिया बुलरीच यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली.

- Advertisement -

या ट्विटमध्ये पॅट्रसिया बुलरीच म्हणाल्या की, ‘महिलेनं स्टार्चच्या पेस्टनं पोट बनवलं असून त्यात १५ गांज्याच्या पुड्या ठेवल्या होत्या आणि मेंडोजा ते सांताक्रूझमध्ये प्रवास करताना तिनं गर्भवती असल्याचं ढोंग केलं.’

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “ही महिला एका प्रवाशासोबत प्रवास करत होती. ज्या कोचमध्ये ती बसली होती त्या कोचमध्ये पोलिसांनी रेड मारली आणि तेव्हा एका माणसाच्या बॅगेत गांज्याची एक छोटी पुडी त्यांना सापडली. यानंतर पोलीसांना संशय आला आणि तेव्हाच त्यांना महिला गर्भवती असल्याचं ढोंग करत आहे, हे समजलं.”

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करीच्या घटना काही नवीन नसून या सारख्या अनेक घटना पूर्वी घडलेल्या आहेत. २०१३ मध्ये विमानानं टोरोंटोला जात असताना एका महिलेला २ किलो कोकेन आपल्या नकली वाढलेल्या पोटात घेऊन जाताना पकडलं होतं. तर २०१५ मध्ये एका महिलेला आपल्या छातीत असलेल्या २ लेटेक्सच्या हातमोज्यामध्ये १.५ किलो कोकेनची तस्करी करताना पकडलं होतं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -