घरमुंबईशिवसेनेचा प्रस्ताव आल्यास दिल्लीला विचारू - बाळासाहेब थोरात

शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास दिल्लीला विचारू – बाळासाहेब थोरात

Subscribe

जर शिवसेनेने तसा प्रस्ताव दिल्यास तो दिल्लीला पाठवू, असे सांगत शिवसेनेला भाजपच्या दबावाखालून बाहेर पडावा लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीला निकाल गुरुवारी जाहीर झाला आणि भाजपचे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले असून, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेत मुख्यमंत्री बसवणार अशी चर्चा सुरू असताना आता काँग्रेसने देखील शिवसेनेचा तसा प्रस्ताव आल्यास विचार करू आणि दिल्लीला विचारू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

काय म्हणालेत नेमकं थोरात 

शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा मीडियात सुरू आहे. पण आम्हाला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही आणि जर शिवसेनेने तसा प्रस्ताव दिल्यास तो दिल्लीला पाठवू, असे सांगत शिवसेनेला भाजपच्या दबावाखालून बाहेर पडावा लागेल, असे देखील ते म्हणाले.

- Advertisement -

माध्यमांकडून दिशाभूल करण्यात आली 

दरम्यान, २१ तारखेला मतदान पार पडल्यानंतर काही प्रसार माध्यमांनी एक्झिट पोल दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. तसेच जे उमेदवार लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले त्यांना माध्यम दोन दिवस पराभूत होणार असे दाखवत होते, असे सांगत थोरात यांनी दाखवण्यात आलेल्या एक्झिट पोलवर टीका केली. तसेच जे एक्झिट पोल करतात त्यांचा हेतू काय असतो हे कळलं पाहिजे. तसेच या बद्दल माध्यमांनी जनतेची दिशाभूल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे देखील थोरात यांनी सांगितले. एवढच नाही तर या एक्झिट पोल करणाऱ्यावर आळा घालण्यासाठी आम्ही विचार करू, असे देखील त्यांनी सांगितले.

१० अपक्ष आमच्या संपर्कात 

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी १० अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत पाच वर्षे जबाबदार विरोधी पक्ष म्हणून पार पाडू, असे देखील ते म्हणाले. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, आम्हाला अपेक्षित यश आले नसले तरी जनेतेने आम्हाला खूप मते दिली असे सांगत आम्हाला ४४ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एवढच नाही तर आम्ही राज्यात २०० सभा घेतल्या. मात्र मुंबईत ज्या प्रकारे अपयश आले, त्याची वरिष्ठांना माहिती दिली जाईल, पण कार्यकर्त्याने काम केल्याचे त्यांनी सांगितले. एवढच नाही तर काँग्रेस पुन्हा मुळासकट उभी करावी लागेल, असे देखील ते म्हणाले.

- Advertisement -

MPCC President Balasaheb Thorat addresses a press conference in Gandhi Bhavan, Mumbai.

Indian National Congress – Maharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 25, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -