घरमहाराष्ट्रनाशिकगुंतवणुकदारांच्या १३.८३ लाखांचा अपहार

गुंतवणुकदारांच्या १३.८३ लाखांचा अपहार

Subscribe

सिडकोच्या पाटीलनगर येथील श्रीनिवास नागरी पतसंस्थेतील प्रकार, पोलिसांत गुन्हा

सिडकोच्या पाटीलनगर येथील श्रीनिवास नागरी पतसंस्थेत एका महिलेने मुलाच्या नावाने १३ लाख ८३ हजार २०६ रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणुकीचे पैसे परत मिळण्यासाठी महिलेने संचालकांना विचारणा केली असता त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यातून फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी शालिनी अशोक शिंदे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बाळासाहेब विश्वनाथ वाघ, किरण दादाजी शेवाळे, विजय शंकर कोतकर, मोहिनीराज दत्तात्रय खानकरी, लोटन नवल पाटील, सुभाष पोपटराव काळे, निलेश चंद्रकांत पाटील, संदीप विश्वनाथ वाघ, वत्सला दादाजी शेवाळे, मनिषा विजय कोतकर, रंजना लोटन पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. शालिनी शिंदे यांनी श्रीनिवास नागरी पतसंस्थेत मुलाच्या नावाने १३ लाख ८३ हजार २०६ रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक रक्कम व्याजासह परत मिळेल, या आशेवर त्यांनी रक्कम ठेवली होती. मात्र, १.४.२००३ ते १.११.२०१३ कालावधीत पतसंस्थेच्या संचालकांनी रकमेचा अपहार केला. गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळावी, यासाठी शिंदे यांनी संचालकांकडे मागणी केली. संचालकांनी त्यांना दरवेळी वेगवेगळी कारणे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बेडवाल करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -