घरमुंबईशिवसेना सत्तेत ५०-५० भागीदार - संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान!

शिवसेना सत्तेत ५०-५० भागीदार – संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान!

Subscribe

सत्तेत भाजप ५०-५० टक्के भागीदार असेल, असं महत्त्वपूर्ण विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता आहे.

एकीकडे राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना भाजपची ‘२२० पार’ची घोषणा पूर्ण होताना दिसत नाही. त्यातच शिवसेनेच्या जागा वाढण्याची शक्यता असून भाजपच्या जागा गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षाही कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना भाजपला खिंडीत गाठू शकते, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ‘शिवसेना हा भाजपसोबत सत्तेतला ५०-५०% भागीदार आहे’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातली मंत्रिपदं आणि त्यासोबतच मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना भाजपकडे मागणी करण्याची शक्यता आहे. अर्थात, भाजपच्या जागा किती कमी होतील आणि शिवसेनेच्या जागा किती वाढतील? यावर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर ठरणार आहे.


Live update – विधानसभा निवडणूक २०१९ : पुण्यात ईव्हीएमचा नंबर बदलल्याचा मनसेचा आक्षेप

विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की काय ठरलंय? सत्तेत नक्की शिवसेना आणि भाजपमध्ये कसं शेअरिंग असेल? याविषयी फक्त चर्चाच होत आहेत. अनेकदा दोन्ही पक्षांमधल्या नेतेमंडळींकडून वेगवेगळी विधानं केली जात होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे फक्त ‘आमचं ठरलंय’ एवढंच सगळ्या सभांमदून सांगत होते. त्यामुळे नक्की सत्तेत कुणाला किती वाटा मिळणार? यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता संजय राऊत यांनी केलेल्या या विधानामुळे शिवसेना भाजपकडे मंत्रिमंडळात अधिक जागांवर दावा करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासोबतच, ५ वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद किंवा २.५ वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी देखील शिवसेना करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमधला सत्तेतल्या वाट्यासाठीचा कलगीतुरा पाहायला मिळू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -