घरमुंबईसत्तास्थापनेसाठी 'रात्रीस खेळ' कसा चालला माहितीये का? वाचा!

सत्तास्थापनेसाठी ‘रात्रीस खेळ’ कसा चालला माहितीये का? वाचा!

Subscribe

राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं पाठिंब्याचं पत्र सादर केल्यामुळे आता भाजपचं संख्याबळ १७०च्या घरात पोहोचलं आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा भल्या सकाळीच राजभवनावर शपथविधी झाला. मात्र, या सगळ्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. एका रात्रीत हा सगळा खेळ कसा झाला आणि थेट शपथविधी कसा करण्यात आला? असा प्रश्न राजकीय वर्तुळासोबतच राज्यातल्या जनतेला देखील पडला आहे. मात्र, आता शुक्रवारी रात्री कशा घडल्या? याचा घटनाक्रमच समोर आला आहे. वाचा कधी काय घडलं!

रात्री ११.४५ वा. – अजित पवार आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात एकमत झालं

- Advertisement -

रात्री ११.५५ वा. – देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यातल्या कुणीही सत्तास्थापनेचा दावा करण्याआधी भाजपने दावा करण्याविषयी पक्षातल्या नेत्यांशी बातचित केली

रात्री १२.३० वा. – राज्यपालांनी त्यांची दिल्ली भेट रद्द केली

- Advertisement -

रात्री २.१० वा. – राज्यपालांच्या सचिवांना सकाळी ६.३० वाजता शपथविधीची तयारी करण्याचे निर्देश दिले

रात्री २.३० वा. – राज्यपालांच्या सचिवांनी राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यासंदर्भातली फाईल पुढच्या दोन तासांमध्ये सादर करू, शपथविधी ७ वाजून ३० मिनिटांनी घ्या अशी माहिती दिली

पहाटे ५.३० वा. – अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं राज भवनावर आगमन

पहाटे ५.४७ वा. – महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यात आली. मात्र, त्यासंदर्भात घोषणा ९ वाजता करण्याचं ठरलं

सकाळी ७.३० वा. – राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शपथविधीला सुरुवात झाली

सकाळी ८.०१ वा. – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शपथ घेत असल्याचं वृत्त समोर आलं

सकाळी ८.१६ वा. – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदारांनी सांगितला सकाळचा घटनाक्रम!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -