घरहिवाळी अधिवेशन 2022सत्तेतील वाचाळवीरांना आवरा; शशिकांत शिंदे यांचे आवाहन

सत्तेतील वाचाळवीरांना आवरा; शशिकांत शिंदे यांचे आवाहन

Subscribe

मंत्री अब्दुल सत्तार यांना नियतिने खेळ दाखवला आहे. त्यांनी बेत्ताल वक्तव्य केले. पण त्यांच्या वक्तव्यावर कोणीही बोलायला तयार नाही. नियतीही कोणालाच सोडत नाही. सत्तार यांचे नवनवीन घोटाळे बाहेर येत आहेत. त्यामुळे असे वक्तव्य करणे थांबले पाहिजे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

नागपूरः नवीन सरकार सत्तेत आल्यापासून महापुरुषांचा वारंवार अपमान केला जातोय. अशाप्रकारे बेत्ताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा, असे आवाहन शुक्रवारी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषेदत केले.

ते म्हणाले, महापुरुषांचा जन्म कुठे झाला, याची नवनवीन माहिती दिली जात आहे. महापुरुषांची तुलना कोणाशीही केली जातेय. हे काही योग्य नाही. महापुरुषांचा अपमान करणे थांबवा अन्यथा नियतीच याचा बदला घेईल. बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करणार असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मात्र त्यांचाच करेक्ट कार्यक्रम झाला आहे. ते मंत्री झाले असते. पण त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले. चंद्रकांत पाटील यांना संधी दिली. बावनकुळे यांना नेता करुन लढायला सोडले, अशी टीका शिंदे यांनी केली.

- Advertisement -

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिले. अजित पवार यांनी मनात आणलं तर तेच करेक्ट कार्यक्रम करतील आणि ते कोणाचेच ऐकणार नाहीत. त्यामुळे जरा सांभाळून बोला, असा सल्लाही शिंदे यांनी बावनकुळे यांना दिला.

मंत्री अब्दुल सत्तार यांना नियतिने खेळ दाखवला आहे. त्यांनी बेत्ताल वक्तव्य केले. पण त्यांच्या वक्तव्यावर कोणीही बोलायला तयार नाही. नियतीही कोणालाच सोडत नाही. सत्तार यांचे नवनवीन घोटाळे बाहेर येत आहेत. त्यामुळे असे वक्तव्य करणे थांबले पाहिजे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे सत्तेतून बाहेर पडले नाही. आम्ही बाहेर पडलो. उद्धव यांनीही बाहेर पडायला हवे होते. असे वारंवार तुम्ही सांगता. पण उद्धव हे बाहेर पडले तर तुम्ही कुठेच राहणार नाहीत. तुमची सत्ता व सर्वंच जाईल, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी शिंदे गटावर केली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी मिळत नव्हता, असा आरोप होत आहे. आता तुमची काय अवस्था आहे. तुम्हाला काही अधिकार आहेत का?, कामे करुन दिली जातात का?, याचा विचार तुम्ही करायला हवा, असेही शशिकांत शिंदे यांनी शिंदे गटाला सुनावले

नवीन सरकार आल्यापासून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे कुठे तरी थांबायलाच हवे. समृद्धी महामार्ग केला याचा डंका पिटवला जातोय. मग इतर रस्त्यांचा विकास कधी करणार, असा सवालही शिंदे यांनी केला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -