घरताज्या घडामोडीRaksha Bandhan 2020 : यंदा बहिणीसाठी खास 'गिफ्ट' आयडिया

Raksha Bandhan 2020 : यंदा बहिणीसाठी खास ‘गिफ्ट’ आयडिया

Subscribe

रक्षाबंधन म्हणजे भावाबहिणीचं अतूट नातं. हे नातं अगदीच वेगळं. त्यात आदर तर असतोच पण, आदराबरोबर येतात त्या खोड्या. एकमेकांविषयी असूयाही असते आणि तितकंच प्रेम आणि काळजीही. वयात कितीही अंतर असो पण, हा गोडवा कधीच कमी होत नसतो आणि हाच सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

- Advertisement -

मात्र, यंदा बहिणीला रक्षाबंधनच काय गिफ्ट द्याव, असा अनेक भावांना प्रश्न पडला आहे. मात्र, काहीही काळजी करु नका. कारण आज आम्ही तुम्हाला काही गिफ्टच्या आयडिया देणार आहोत.

Anti पॉल्यूशन स्कार्फ

- Advertisement -

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मुलींना सर्वच गोष्टीत फॅशन हवी असते. त्याप्रमाणे आता मुलींना रंगीबेरंगी आणि आपल्या ड्रेसला मॅचिंग असे स्कार्फ हवे असतात. त्यामुळे यंदा भाऊ आपल्या बहिणीला सुंदर आणि फॅशनेबल असे Anti पॉल्यूशन स्कार्फ देऊ शकतात. हे गिफ्ट तुमच्या बहिणीला नक्कीच आवडेल.

हँड सॅनिटायझर

nagpur man gautam goswami dies after drinking sanitizer
 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि हँड सॅनिटायझरने सतत हात स्वच्छ करणे असं वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे यंदा तुम्ही तुमच्या बहिणीला हँड सॅनिटायझर भेट म्हणून नक्की देऊ शकता. याचा ती नक्की वापर करेल.

पॉवरबँक

power bank

मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण घराबाहेर पडताना नेहमी मोबाईल सोबत घेतो आणि मगच घराबाहेर पडतो. परंतु, बाहेर किंवा ऑफिसला गेल्यावर आपण चार्जिंग संपली का आपण आपल्या सहकाऱ्यांकडे चार्जर मागतो. परंतु, सध्या कोरोनाच्या काळात एकमेकांच्या वस्तू वापरणे शक्यतो टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदा तुम्ही तुमच्या बहिणीला पॉवरबँक घेऊन द्या. यामुळे तिला कोणाचा चार्जर वापरण्याची किंवा मोबाईलची चार्जिंग संपण्याचा संबंधच येणार नाही.

टेबल (Multi-Purpose Table)

सध्या अनेकांचे ऑफिसचे काम घरुनच केले जात आहे. त्यामुळे बऱ्याचदा जमिनीवर किंवा बेडवर बसून लॅपटॉप मांडीवर घेऊन काम केले जाते. जे हानिकारक आहे. त्यामुळे यंदा तुम्ही तुमच्या बहिणीला टेबल (Multi-Purpose Table) गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे गिफ्ट तिला नक्की आवडेल यात शंका नाही.

योगा मॅट

राज्यात सुरू होणाऱ्या मिशन बिगीन अगेनच्या पुढील टप्प्यात इनडोअर जिम, व्यायामशाळा बंदच राहणार आहेत. त्यामुळे घरच्या घरी व्यायाम आणि योगा करावा लागणार  आहे. त्यामुळे यंदा तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला योगा मॅट गिफ्ट करु शकता. विशेष म्हणजे अगदी स्वस्त मस्त गिफ्ट आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -