घरअर्थजगतसावधान! PF खातेधारकांसाठी अलर्ट; 'या' क्रमांकावर संपर्क केल्यास रिकामं होऊ शकतं खातं

सावधान! PF खातेधारकांसाठी अलर्ट; ‘या’ क्रमांकावर संपर्क केल्यास रिकामं होऊ शकतं खातं

Subscribe

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जाहीर सूचना करत पीएफ खातेधारकांना सावधानता बाळगण्यास सांगितले आहे

जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर ही बातमी नक्की वाचा. नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जाहीर सूचना करत पीएफ खातेधारकांना सावधानता बाळगण्यास सांगितले आहे.Google वर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना बांद्रा 1, 2, 3 आणि 4 समोर काही घटना आल्या आहेत. ईपीएफओ वांद्रे कार्यालयाचा संपर्क सर्च केला जातो. तेव्हा कार्यलयाचे नाव, पत्ता कार्यालयीन वेळ इ. तपशील योग्य दिसत आहे. मात्र यामध्ये 09102195592 हा मोबाइल क्रमांक दिसतोय. परंतू हा क्रमांक वापरणारा तोतया असल्याचे EPFO कडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 09102195592 या नंबरशी कोणतेही व्यवहार करु नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ईपीएफओकडून अशी सूचना जाहीर

ईपीएफओ कडून जारी करण्यात आलेल्या सूचनेमध्ये असे म्हटले आहे की, Truecaller App वर हा क्रमांक कुणाचा आहे हे जेव्हा शोधले तेव्हा दीपक शर्मा या व्यक्तीच्या नावावर हा क्रमांक दिसत आहे. हा क्रमांक वापरणारी व्यक्ती युनिव्हर्सल अकाऊंट नंबरमधील (UAN) केवायसी स्टेटसचे अपग्रेडेशन, पीएफमधून पैसे काढणे इत्यादी प्रक्रियांकरता ईपीएफओ वर्गणीदार आणि सदस्यांकडून पॅन कार्ड, आधार कार्ड आणि एटीएम कार्ड क्रमांकाची मागणी करत आहे.

- Advertisement -

PF खातेधारकांसाठी अलर्ट!

दरम्यान, ईपीएफओने असे म्हटले आहे की, EPFO कडून ईपीएफओ वर्गणीदार, निवृत्ती वेतनधारक आणि सदस्यांना अशाप्रकारे कोणतीही मागणी करत नाही. फोन किंवा ईमेलवरून EPFO अशा कोणत्याच कागदपत्रांसाठी मागणी करत नाही, हे पीएफ खातेधारकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.

तोतया व्यक्तीचा तपास सुरू

ईपीएफओ वांद्रे ऑफिस संदर्भात येणाऱ्या तपशीलातील क्रमांक 09102195592 ज्याचा आहे, तो दीपक शर्मा तोतया असल्याचे या प्रसिद्धी सूचनेत सांगण्यात आले आहे. याप्रकरणी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना बांद्रा 1, 2, 3 आणि 4 कडून बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये आणि निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये वरीष्ठ पोलीस निरिक्षकांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सदर व्यक्तीचा तपास देखील सुरू आहे.


चालकाला हार्ट अ‍ॅटॅक आल्याने BEST बसला अपघात; प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -