घरदेश-विदेशसप्टेंबरपासून अॅमेझॉनवर जेवण देखील मिळणार!

सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर जेवण देखील मिळणार!

Subscribe

अॅमेझॉन या ऑनलाईन मार्केट वेबसाईटवर आता स्विगी आणि झोमॅटोप्रमाणेच फूड डिलिव्हरी सर्व्हिस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ऑनलाईन फूड ऑर्डर व्यवसायात आत्तापर्यंत तुम्हाला स्विगी, झोमॅटो अशा ब्रॅण्ड्सबद्दल माहिती आहे. पण आता त्यामध्ये एका महाकाय हत्तीची एंट्री होणार आहे. ऑनलाईन बिझनेसमध्ये मोठा ब्रॅण्ड असलेल्या अॅमेझॉनने आता स्विगी आणि झोमॅटोप्रमाणेच ऑनलाईन फूड सर्व्हिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर पासून अॅमेझॉनवर तुम्हाला जेवण ऑर्डर करता येणार आहे. त्यासाठी अॅमेझॉनने देशभरातल्या हॉटेल-रेस्टॉरंटशी करार करायला सुरुवात केली असून स्विगी आणि झोमॅटोपेक्षाही कमी किंमतीत अॅमेझॉन ही सेवा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या स्पर्धेमुळे या सेवांचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाईन जेवण ऑर्डर करणाऱ्या खवय्यांचे पैसे वाचतील यात शंका नाही!

बंगळुरूपासून होणार सुरुवात

अॅमेझॉनही ही सेवा सर्वात आधी बंगळुरू, त्यानंतर मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याशिवाय ओलामध्ये सेवा देणाऱ्या फूडपांडाची पूर्ण सिस्टीम अॅमेझॉन यासाठी विकत घेणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. प्रामुख्याने प्राईम नाऊ आणि अॅमेझॉन वेबसाईटवरची उत्पादनं पुरवणारे बाईकर्स आणि रायडर्सचा वापर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी करण्यात येणार आहे. जिथे स्विगी आणि झोमॅटो जवळपास २० टक्के कमिशन घेत असताना अॅमेझॉन मात्र ५ ते ६ टक्क्यांवरच व्यवसाय करणार असल्याचं सांगितलं जात असल्यामुळे ग्राहकांना स्वस्तामध्ये सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अॅमेझॉनमध्ये मेगाभरती; १३०० जागांची रिक्त पदे

भारताबाहेर अॅमेझॉनला अपयश

दरम्यान, भारताच्या बाहेर अॅमेझॉनने असा प्रयोग २०१५ सालीच केला होता. मात्र, जून २०१९मध्ये त्यांनी अशी फूड डिलिव्हरी सिस्टीम बंद केली. पण नुकतीच त्यांनी लंडनमधील ‘डिलिवरो’ या फूड डिलिव्हरी स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -