घरताज्या घडामोडीदेशात २४ तासांत १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

देशात २४ तासांत १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

Subscribe

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहोचली असून २ लाख १५ हजार १२५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत १६ हजार ८९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

राज्यात आज ५ हजार २५७ नवे रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. राज्यात आज ५ हजार २५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज १८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७८ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ टक्के एवढा आहे. राज्यात आज २ हजार ३८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ८८ हजार ९६० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.३७ टक्के एवढं आहे.


हेही वाचा – कोरोना नेमका कुठून आला, याचा शोध WHO घेणार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -