चक्क ७१ हजार टूथपिक्सने तयार केला राष्ट्राचा ध्वज!

Amritsar
amritsar teacher creates national flag with 71k toothpicks before republic day twitter salutes him
चक्क ७१ हजार टूथपिक्सने तयार केला राष्ट्राचा ध्वज!

दोन दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अमृतसर मधील सरकारी शाळेतील शिक्षकाने चक्क ७१ हजार टूथपिक्सचा ध्वज तयार केला आहे. या शिक्षकाचं नावं बलजिंद्र सिंग असून त्याने ४० दिवसांमध्ये या ध्वज तयार केला आहे. ‘प्रजासत्ताक दिना अगोदर मी टूथपिक्सचा ध्वज तयार केला’, असं ते म्हणाले. ‘जे यापूर्वी कोणी केलं नाही असं काहीतरी करण्याचा विचार मी बऱ्याच काळापासून करत होतो. त्यामुळे मी ही कल्पना केली. हा सर्वात लांब ध्वज असावा असं मला वाटतं. मला हा ध्वज तयार करण्यास ४० दिवस लागले’, असं सिंग यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं.

पुढे बलजिंद्र सिंग म्हणाले, ‘प्रजासत्ताक दिन जिल्हास्तरावर साजरा होणार आहे. याप्रसंगी मी हा ध्वज सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे.

सोशल मीडियावर या शिक्षकाने केलेल्या या प्रयत्नाबाबत कौतुक केलं जात आहे. ‘आम्ही तुमच्या देशभक्तीला सलाम करतो’, असं एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्याने ‘छान प्रयत्न असाच सुरू ठेवा’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा अजून काय म्हणाले नेटकरी?


हेही वाचा – अमित ठाकरेंच्या राजकीय भवितव्यासाठी पत्नी मिताली ठाकरे ‘लकी’