घरदेश-विदेशसंबित पात्रा म्हणतात, अर्णब भारतीय प्रसारमाध्यमांचे मंडेला

संबित पात्रा म्हणतात, अर्णब भारतीय प्रसारमाध्यमांचे मंडेला

Subscribe

रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी अर्णब यांची तुलना थेट महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्याशी केली आहे. अर्णब गोस्वामी हे तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे वेगळ्या स्वरुपात दिसतील असे संबित पात्रा म्हणाले.

अर्णब यांना महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या सारखा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला अर्णब अगदी वेगळ्या स्वरुपात दिसतील असं पात्रा यांनी म्हटले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब हे भारतीय प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील आणि ते प्रसारमाध्यमांचे चेहरामोहरा बदलून टाकतील असा दावा पात्रा यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

- Advertisement -

“ही घटना अर्णब यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे. या पुढे मी अर्णबला भारतीय प्रसारमाध्यमांचा नेल्सन मंडेला म्हणेल. अर्णब भारतीय प्रसारमाध्यमांना कायमचा बदलून टाकेल असा मला विश्वास आहे. ब्रिटीशांनी गांधींना चालू ट्रेनमधून बाहेर धक्का दिल्यानंतर ते महत्मा गांधी झाले. त्यामुळेच त्यांनी लढा सुरु केला आणि ते पुढे खूप मोठे नेते झाले. त्यांना जो त्रास द्यायला नको होता तसा त्रास देण्यात आला. तशाच पद्धतीचा त्रास सध्या अर्णब यांना दिला जात आहे. मला सर्व भारतीयांना सांगायचे आहे की आपल्याला लवकरच पूर्णपणे बदलेला वेगळा अर्णब पहायला मिळेल,” असे पात्रा म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -