घरदेश-विदेशभारतातूनच काळे उंदिर जगभरात पसरले!

भारतातूनच काळे उंदिर जगभरात पसरले!

Subscribe

'काळ्या उंदरांचा उगम आणि प्रसार' या विषयावर प्रा.डॉ. मुमताज बेग यांनी संशोधन केले आहे. या संशोधनातून काळे उंदिर हे भारतातूनच जगभरात पसरले असे सिद्ध झाले आहे.

काळे उंदिर हे भारत देशातूनच जगभरात पसरले असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. हे उंदिर देशातून समुद्रमार्गे विविध देशात पसरले असल्याचे संशोधनात म्हटले आहे. हे संशोधन अमरावतीचे शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेचे प्रा.डॉ. मुमताज बेग यांनी केले. ‘काळ्या उंदरांचा उगम आणि प्रसार’ या विषयावरील शोधनिबंधात प्रा.डॉ. मुमताज बेग यांनी या नोंदी घेतल्या आहेत. यामध्ये जगभरातील काळ्या उंदरांचे डीएनएचे संशोधन करण्यात आले. या संशोधनाचा शोधनिबंध स्वित्झर्लंडच्या ‘बायोलॉजिक इन्व्हिशन’ या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला आहे. हे संशोधन अमेरिकेच्या कार्नेल विद्यापीठात करण्यात आले. या संशोधनासाठी २०१५ मध्ये प्रा.डॉ. मुमताज बेग यांनी भारताची फेलोशिप घेतली होती. या संशोधनात बेग यांना विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. जेरेमी सिअर्ल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हेही वाचा – ६ महिन्यात २ लाख उंदरांचा खात्मा

- Advertisement -

संशोधनातून ‘ही’ माहिती मिळाली

प्रा.डॉ. मुमताज बेग यांच्या शोधनिबंधानुसार उंदराच्या दोन प्रजाती आढळल्या आहेत. त्यामध्ये एक प्रजातीमध्ये ३८ गुणसुत्रे तर दुसऱ्या प्रजातीत ४२ गुणसुत्रे आढळली आहेत. ४२ गुणसुत्र असलेले प्रजातीचे उंदिर हे साधारणत: गंगा नंदी आणि पूर्व भारतात आढळतात. हे उंदिर ३८ गुणसुत्र असलेल्या प्रजातींचे पूर्वज आहेत. आठ हजार वर्षांपूर्वी भारतात शेती करण्यास सुरुवात झाली. याच भागात हडप्पा आणि सिंधू संस्कृती उदयास आली आणि तेथील उत्पादने मेसोपोटेमियासह जगाच्या विविध भागांत व्यापारमार्गे पोहोचली. व्यापाराबरोबरच काळे उंदिरही जहाजात बसले आणि ते दुसऱ्या देशात जावून पोहोचले. उंदरांनी तेथील हवामानाशी जूळवून घेतले त्यामुळे त्यांची पिढी चालत राहिली. ही सर्व उंदिर एकच असल्याचे डीएनए तपासणीतून सिद्ध झाले आहे.


हेही वाचा – संशोधन प्रकल्प अहवालात हेराफेरी ; विद्यापीठाने पाठवल्या ४०० प्राध्यापकांना नोटीसा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -