घरताज्या घडामोडीअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनाने मृत्यू?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनाने मृत्यू?

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झाल्याचे सीएनएनच्या न्यूज १८च्या वृत्तानुसार समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही.

अहवाल आला होता कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, दाऊदची पत्नी महजबीन हिला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचं पाकिस्तानमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या अहवाल्याने सांगितले होते. त्यामुळे दाऊद आणि पत्नी महजबीन हिला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्याच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे.

- Advertisement -

मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने ब्रिटनमधील एका न्यायालयाला दाऊत इब्राहिम सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती दिली होती. पण, आता सीएनएनच्या वृत्तानुसार दाऊदला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे आता पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

या वृत्तानुसार दाऊद लष्कर ए तोयबाच्या काही लोकांना दहा दिवसांपूर्वीच भेटला होता. तसेच तो काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमधून कराचीमध्ये आला. त्यामुळे आता दाऊदला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्तींशी तो संपर्कात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा – रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -