घरCORONA UPDATECoronaVirus : शाहीनबागेतल्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी हटवलं!

CoronaVirus : शाहीनबागेतल्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी हटवलं!

Subscribe

करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये, म्हणून दिल्लीच्या शाहीन बागेत मोठ्या संख्येनं जमलेल्या आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी सक्तीने हटवलं आहे.

देशात सुरू असलेल्या करोना व्हायरसच्या फैलावाचा फटका राजधानी दिल्लीला देखील बसला आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव रोखण्यासाठी शाहीन बागेमध्ये सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांना अनेकदा पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने आंदोलन थांबवून घरी परतण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, त्याचा काहीही परिणाम इथल्या आंदोलकांवर झाला नाही. मोठ्या संख्येने आंदोलक इथे एकत्र होते. त्यामुळे अखेर दिल्ली पोलिसांनी सक्तीने इथल्या आंदोलकांना घरी पाठवून शाहीन बाग मोकळा केला आहे. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरू असलेलं हे आंदोलन अखेर थांबलं आहे. मात्र, आता आंदोलकांची पुढची दिशा काय असेल? याविषयी मात्र काही कळू शकलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -