घरदेश-विदेशलोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसची मंथन बैठक

लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसची मंथन बैठक

Subscribe

लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज, शनिवारी बैठक होणार आहे. या वेळी पराजयाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा कार्यकारिणीसमोर सादर करण्याची शक्यता आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारून काही राज्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी भविष्यकाळात काय उपाय योजता येतील, यावरही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होईल. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फक्त ५२ जागांवर विजय मिळाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत या पक्षाला फक्त ४४ जागा मिळाल्या होत्या.

दुसऱ्यांचा मोठ्या पराभवाला सामना 

गेल्याच वर्षी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पक्षात नवसंजीवनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला तुल्यबळ लढत देतील, अशी अपेक्षा असताना, काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सपशेल निराशा केली आहे. देशातील १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता न आलेल्या काँग्रेसला पाच वर्षांपूर्वी जिंकलेल्या ४४ जागांवरून केवळ ५२ जागांवरच पोहोचता आले. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवतील, अशी चर्चा असून त्यांचा राजीनामा फेटाळला जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय कोणीही पक्ष चालवू शकत नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी आपल्या कार्यशैलीत लक्षणीय बदल करण्याची आवश्यकता असल्याचेही अनेक काँग्रेस नेत्यांना वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -