घरदेश-विदेशपृथ्वीचे नाव बदलल्याने मस्क झालेत ट्रोल

पृथ्वीचे नाव बदलल्याने मस्क झालेत ट्रोल

Subscribe

पृथ्वीला पृथ्वी का म्हणतात? पृथ्वीला वेगळे नाव दिल्यामुळे अमेरिकेतील उद्योग सम्राट इलॉन मस्क सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.

‘स्पेस एक्स’ चे मालक आणि अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क हे त्यांच्या कामांमुळे नेहेमीच चर्चेत असतात. सध्या त्यांनी ट्विटरवर केलेल्या एका वक्तव्यामुळे ते लोकांमध्ये पून्हा चर्चेत आले आहे. पृथ्वीचे नाव बदलणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. पृथ्वीचे नाव हे पाणी ठेवले पाहिले असे ट्विट केले होते. यानंतर त्यांनी गांजा पिल्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य केले असल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली. इलॉन मस्क हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांची स्पेस एक्स कंपनी अमेरिकेतील नासाबरोबर सध्या अंतराळ मोहीम राबवत आहे.

इलॉन मस्क आणि गांजाचा संबध 

स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांचा गांजा पितांनाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवण्यात आली. इलॉन मस्क यांनी लिहिलेले कारण रास्त असले तरीही लोकांनी त्यांना ट्रोल केले. सध्या त्यांची कंपनी आणि नासा मंगळावरील मोहीमेवर काम करत आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले मस्क

‘पृथ्वीला पाणी म्हटले पाहिजे. पृथ्वीचा पृष्ठभाग ७१ टक्के पाण्यांनी व्यापला आहे. मंगळ हा पृथ्वीसारखाच असून सर्व बाजूने जमिनीने वेढलेला आहे.’ – इलॉन मस्क

- Advertisement -

लोकांच्या प्रतिक्रिया

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -