घरदेश-विदेशमनोहर पर्रिकरांची प्रकृती स्थिर; गोव्यात नेतृत्व बदल नाहीच

मनोहर पर्रिकरांची प्रकृती स्थिर; गोव्यात नेतृत्व बदल नाहीच

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची प्रकृती स्थिर आहे. पर्रिकरांवर त्यांच्या गोव्यातील निवास्थानी उपचार सुरु आहेत. येत्या काही दिवसात ते गोव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती गोव्याचे भाजप अध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी दिली आहे.

गोव्यामध्ये भाजप सरकार संकटात असल्याची चर्चा सुरु असताना आता गोव्याचे भाजप अध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगत राजकिय गोंधळावर पडदा टाकला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याबाबत पसरवली जाणारी अफवा पूर्णत: चूकीची आहे. भाजप आघाडीचे सरकार स्थिर असून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील असा विश्वास तेंडूलकर यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

२४ तास डॉक्टरांची टीम पर्रिकरांजवळ

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर फेब्रुवारीपासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्याच्यावर आतापर्यंत गोवा, मुंबई, अमेरिका त्यानंतर दिल्लीमध्ये उपचार झाले आहेत. जवळपास एक महिना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेऊन पर्रिकर रविवार गोव्यात त्यांच्या घरी आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते. तसंच इथून पुढे त्यांच्यावर गोव्यातील त्यांच्या घरीच उपचार होणार असून २४ तास डॉक्टरांची टीम त्यांच्याजवळ असणार असल्याचे सांगितले आहे.

दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर बैठक

मनोहर पर्रिकरांची प्रकृती आता स्थिर असून दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर त्यांना बरे वाटेल. त्यानंतर ते पक्षाचे पदाधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आज भाजप नेत्यांची बैठक संपल्यानंतर भाजप अध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषद घेतली. गोव्यामध्ये नेतृत्व बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसंच तेंडुलकरआणि गोव्याचे भाजप सरचिटणीस सदानंद तनावडे यांनी पर्रिकरांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. डॉक्टरांनी पर्रिकरांना एक आठवडा आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

संबंधित बातम्या –

मनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज; रेड अॅम्ब्युलन्समधून गोव्यात दाखल

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच असणार – अमित शहा

मनोहर पर्रीकरांना द्यायचाय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

मनोहर पर्रिकर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होणार

मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -