घरदेश-विदेशयुपीतल्या इफ्को प्लॅंटमध्ये अमोनियाची गळती, दोन अधिकारी मृत्यूमुखी

युपीतल्या इफ्को प्लॅंटमध्ये अमोनियाची गळती, दोन अधिकारी मृत्यूमुखी

Subscribe

उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे फूलपूर इफ्को प्लॅंटमध्ये मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या अमोनिया गॅसगळतीमुळे दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. वी पी सिंह आणि अभयनंदन असे मृत्यूमुखी पडलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. गॅस गळतीचा त्रास होऊन जवळपास १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू होण्याचा प्रकार घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार युरिया उत्पादनाच्या वेळी पंप लिकेज होऊन गॅसगळती झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता फूलपूर इफको प्लॅंटच्या पी १ युनिटमध्ये अमोनिया गॅसची गळती सुरू झाली होती.

- Advertisement -

गॅसगळती रोखण्यासाठी पोहचलेल्या वी पी सिंह हे या अपघातात पुर्णपणे अडकून पडले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी एक अधिकारी अभयनंदन हेदेखील त्याठिकाणी फसले. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांचा या घटनेत मृत्यू ओढावला आहे. या दोन अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत असतानाच संपुर्ण प्लॅंटमध्ये अमोनिया गॅसगळती झाली होती. त्यामुळे प्लॅंटमध्ये उपस्थित आणखी १५ कर्मचारीही गॅसच्या संपर्कात आले होते. या गॅस गळतीमुळे अनेक कर्मचारी हे बेशुद्धही झाले. पण या सर्व घटनेत गॅसची गळती कशी झाली याचा मात्र शोध लागलेला नाही. या संपुर्ण प्रकरणात चौकशी झाल्यानंतरच गॅस गळतीचे कारण समजू शकेल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -