काश्मीरच्या ‘त्राल’मध्ये आयईडीचा स्फोट

जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये आयईडी स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामातील हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा आयईडी हल्ला केल्याचे समोर आले आहे.

Jammu-Kashmir
jammu kashmir : jammu kashmir ied attack latest update attack in tral of jammu
त्रालमध्ये आयईडीचा स्फोट

शांततेच्या गप्पा मारत असतानाच सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत – पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या तणावामुळे जम्मूतील अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून सतत गोळीबार करण्यात येत आहे. आताही जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये आयईडी स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामातील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी आता पुन्हा एकदा आयइडी हल्ला केल्याचे समोर आले आहे. या स्फोटामध्ये एक घर उद्ध्वस्त झाले असून यात कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. आसपास वर्दळ नसलयामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून एक जण जखमी झाला आहे.

रस्त्यावर मोठे खड्डे

या स्फोटानंतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे लष्कराच्या गाड्यांना अडथळा निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी ताफ्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या जमात-ए-इस्लामीच्या कार्यालयाला पोलिसांकडून सील देखील करण्यात आले आहे.

पूंछ येथे गोळीबार

जम्मू-काश्मीरमधील मेंढार, पूंछ, बालाकोट आणि कृष्णा घाटी परिसरात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात पूंछ जिल्ह्यातील सलोत्रीमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला आहे. यात एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका जखमीची ओळख पटू शकलेली नसून दुसऱ्या जखमीचे नाव मोहम्मद युनूस आहे. तर युनूस यांची पत्नी रबीन कौसर (३२), फजान (५) आणि मुलगी शबनम (९ महिने) यां तिघांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. मोहम्मद युनूस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


पहा – पाकिस्तान ‘भिकारी’, दहशतवादी ‘डुकरं’… लोकांचा उच्छाद

वाचा – अभिनंदन यांच्यासोबतच्या ‘या’ महिला कोण? घ्या जाणून


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here