लॅपटॉप स्लीप मोडवर ठेवल्यामुळे लागली आग!

या घटनेच्या वेळी राहुलची पत्नी कामावर गेली असल्यामुळे त्याला खिडकीतून बाहेर पडावं लागलं.

Laptop on bed triggers fire, man uses bathroom window to reach safety

२६ वर्षीय राहुल सिंगसोबत एक धक्कादायक घटना घडली. नेहमीप्रमाणे आपल्या लॅपटॉप बेडवर ठेऊन तो झोपायला गेला. मात्र सकाळी उठून पाहिलं तर सर्व घरात धूरचं धूर झाला होता. सर्व घरात काळा धूर पसरला असल्यामुळे दिसेनास झालं होत. त्यामुळे राहुलने बेडला नेमकी आग कशामुळे लागली हे शोधण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनेमुळे राहुलचा थोडक्यात जीव वाचला.

घरात धुर झाल्यामुळे राहुला काहीचं दिसतं नव्हतं. तसंच श्वास घेण्यासाठी देखील समस्या होत होती. म्हणून राहुला बाथरूम मधील खिडकीतून बाहेर पडावं लागलं. अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत त्याला सातव्या मजल्यावर खिडकीतून उडी मारून एका ठिकाणी सुरक्षित बसावं लागलं.

राहुल नोएडा येथील एका मल्टिनॅशल नेटवर्किंग आणि टेलिकम्युनिकेशन कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. त्याने असं सांगितलं की, ‘मी रात्रीची शिफ्ट करून मंगळवारी पहाटे घरी आलो. त्यानंतर लॅपटॉपवर काम करून झोपलो.’

पुढे तो असं म्हणाला की, ‘मी माझा लॅपटॉप हा स्लीप मोडवर करून बेडवर ठेवला आणि दुसऱ्या बेडरूममध्ये झोपलो. काही तासांनंतर सकाळी साडे आठच्या सुमारास मी उठलो आणि मला सगळीकडे धूर दिसला. त्या धुरामुळे मला उलट्या होऊ लागल्या. संपूर्ण घरात काळा धूर पसरला होता. मी माझा लॅपटॉप ज्या बेडवर ठेवला होता, त्या बेडला आग लागली होती. मला काही दिसेनासे झालं होत. मी श्वास घेण्यासाठी बाथरूममधील खिडकी जवळ गेलो.’

‘माझी पत्नी घराला कुलूप लावून कामावर गेली होती. धूर इतका होता की मला दाराजवळ जाऊन दार उघडणे शक्य नव्हतं. म्हणून मी बाथरूम मधील खिडकी उघडली आणि मी ४ ते ५ फूट अंतरावर रांगत जाऊन एका ठिकाणी उडी मारली’, असं राहुलने सांगितलं.

हे सर्व घडल्यानंतर राहुलच्या ओरडण्यामुळे त्याच्या सर्व सोसायटी मधील रहिवाशी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली.

अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुनील कुमार सिंह यांनी असं सांगितलं की, ‘ही एक भीतीदायक परिस्थिती होती. आम्ही जेव्हा घरामध्ये गेलो तेव्हा सर्वत्र काळा धूर पसरला होता. आम्ही बेडवर असलेल्या प्लॅपटॉपच्या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर आमचे अग्निशमन दलाचे जवान छतावर गेले आणि राहुला दोरीच्या साहाय्याने सुरक्षित ठिकाणी आणले. राहुल सिंह हा यूपीमधील राहिवासी असून त्याची पत्नी बालवाडीवर शिक्षिका आहे.


हेही वाचा – आता पुतळे घेणार वाहतूक पोलिसांची जागा!