Live Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण!

News Live Update
ताज्या बातम्यांचे लाईव्ह आपडेट


राज्यात २३,३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११,२१,२२१ झाली आहे. राज्यात २,९७,१२५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४७४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३०,८८३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७५ टक्के एवढा आहे.


टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये अधिकाऱ्यासह २५ पोलीस कर्मचारी कोरोना बाधित !

टिटवाळा म्हणजेच कल्याण तालुका पोलीस ठाण्यात एकंदरीत अधिकाऱ्यांसह ८५ कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या गावांच्या सीमांसह एकूण ६७ गावे त्यांच्या हद्दीत आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून येथील अधिकारी व कर्मचारी वर्ग कोरोना बरोबर अगदी सहजच मुकाबला करीत असताना तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याचे काम करीत होते .पोलिस स्टेशनमधील कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी आजच्या अवघड परिस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने आणि त्यातच २५ कर्मचारी बाधित असल्याचा रिपोर्ट पुढे आल्याने संपूर्ण पोलीस स्टेशन या रिपोर्ट मुळे घबराटीच्या छायेखाली वावरत आहे.


आमदार निवासस्थानी शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. सध्या त्यांची समजूत घ्यालण्यात येत आहे. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.


राष्ट्रपती राजवट लागू करा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून आहेत. घराबाहेर कधी पडणार. म्हणून राज्याची ही परिस्थिती. सर्व फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करणं योग्य नाही.


बाबरी मशीद विद्ध्वसं प्रकरणी ३० सप्टेंबर रोजी निर्णय येणार, तब्बल २७ वर्षांनंतर सीबीआय न्यायालय निकाल सुनावणार, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.


कोरोनावरील लसीबाबत रशियाचा भारतीय कंपनीसोबत करार झाल्याचं समोर येत आहे. भारताच्या डॉ. रेड्डीज कंपनीसोबत रशियाच्या आरडीआयएफ कंपनीचा करार झाला आहे. या अंतर्गत भारताला जवळपास ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे १० कोटी डोस देण्यात येणार आहे.


बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी ३० सप्टेंबरला निर्णय येणार असल्याचे समोर येत आहे. तब्बल २७ वर्षांनंतर सीबीआय विशेष न्यायालय निर्णय सुनावणार आहे. याप्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी , उमा भारती यांचासह ३२ जण आरोपी आहेत.


ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कोरोनावर मात केली आहे. आज त्यांनी हॉस्पिटमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत ते म्हणाले की, आपल्या अनेकांच्या सदिच्छा, श्रींच्या कृपेने आणि डॉक्टर्सच्या उपचारांमुळे मी आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होत आहे. प्रकृती सुधारत आहे. लवकरच संपूर्ण बरा होऊन पुनःश्च सेवेत रुजू होईन.’


मंगळवारी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाबाबत भाष्य केले होते. यावेळी त्यांनी कंगना रनौतला फटाकारले होते. याच पार्श्वभूमीवर आता कंगनाने ट्विट करत जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, ‘कोणतं ताटात दिलं आहे जया जी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने? एका ताटात मिळतं होतं. ज्यामध्ये दोन मिनिटांचा रोल, आयटम नंबर्स आणि एक रोमांटिक सीन मिळत होता. ते पण हिरो सोबत झोपल्यानंतर. मी या इंडस्ट्रीला स्त्रीवाद शिकवला. ताट देशभक्तीवरील आधारित चित्रपटांनी सजवलं. हे माझं स्वतःच ताट आहे, जया जी, तुमचं नाही.’


पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्यांनी वयाच्या ७६व्या वर्षी अल्पशा आजाराने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.


मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजपासून बीएमसी ‘मिशन मास्क’ राबवणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारती लॉकडाऊन करणार आहे.


मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांचे वडील विल्यम एच गेट्स यांचे निधन झाल्याचे समोर येत आहे. त्यांनी वॉशिंग्टमधील राहत्या घरी सोमवारी ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते अल्झामयरने पीडित होते. बिल गेट्स यांच्या कुटुंबानी याबाबत मंगळवारी माहिती दिली.


अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी एनसीबी एसआयटी कार्यालयात दाखल झाली आहे. काल तिला एनसीबीने समन्स बजावले होते.


देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ९० हजार १२३ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून १ हजार २९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा पार केला असून एकूण संख्या ५० लाख २० हजार ३६०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८२ हजार ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३९ लाख ४२ हजार ३६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ लाख ९५ हजार ९३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि मुख्तार अब्बास नकवी संसद भवनात पोहोचले.


देशात १५ सप्टेंबरपर्यंत ५ कोटी ९४ लाख २९ हजार ११५ नमुन्यांच्या झाल्या आहे. यापैकी मंगळवारी ११ लाख १६ हजार ८४२ नमुन्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ कोटींच्या उंबरठ्यावर आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगातील कोरोनाबाधितांचा आकडा २ कोटी ९७ लाखांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ९ लाख ३८ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत २ कोटी १५ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


भारतातील कोरोनाबाधितांच्या आकडा ५० लाख पार!

भारतातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने ५० लाखांचा टप्पा पार केला आहे. भारतात आतापर्यंत ५० लाख १८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत ८२ हजारांहून अधिक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच ३९ लाख ३९ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.