घरदेश-विदेशघ्या, मतांसाठी आता भाजप करणार जादूचे प्रयोग!

घ्या, मतांसाठी आता भाजप करणार जादूचे प्रयोग!

Subscribe

देशात ५ राज्यांमध्ये येत्या दोन महिन्यांमध्ये निवडणुका आणि मतमोजणी होणार असल्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने प्रचारासाठी जादुच्या प्रयोगांची मदत घेतली आहे.

जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसा सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जाऊ लागल्या आहेत. शिवाय पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून तर या राज्यांमध्ये प्रचाराला चांगलीच धार चढली आहे. त्यात आता सत्ताधारी भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जादूचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी भाजपाने खास जादूगारांनाही नेमलं आहे! उत्तर प्रदेशमध्ये गेल्या १५ वर्षांची आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपने येनकेन प्रकारेण मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयोग सुरू केले आहेत. त्यासाठीच भाजपाने जादूचे प्रयोग करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे!

६ जादुगार करणार भाजपचे ‘प्रयोग’!

मध्य प्रदेशमध्ये येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जादूचे प्रयोग, नाटकांच्या माध्यमातून प्रचार करण्याचा अजब फंडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे जादूगार ग्रामीण भागात जादूचे प्रयोग दाखवणार आहेत. असं करतानाच भाजप सरकारने १५ वर्षांमध्ये केलेल्या कामाची माहिती लोकांना देणार आहेत. यासाठी ६ जादुगारांची मदत घेतली जाणार असून त्याद्वारे १५१ मतदारसंघांमध्ये प्रचार केला जाणार असल्याची माहिती मध्य प्रदेश भाजपचे प्रवक्ते रजनीश अगरवाल यांनी दिली आहे.

- Advertisement -

वाचा सविस्तर – २०१९ची रंगीत तालीम सुरू; ५ राज्यांमध्ये निवडणुकांची घोषणा!


काँग्रेसची जोरदार टीका

मात्र, भाजपने एकीकडे जादुगारांच्या मदतीने प्रचारासाठी कंबर कसली असली, तरी काँग्रेसने त्यावर ‘क्रिएटिव्ह’ टीका सुरू केली आहे. ‘भाजप सरकार गेल्या १५ वर्षांपासून भ्रम पसरवून लोकांना फसवत असून आता कोणताही भ्रम चालणार नाही’, अशा शब्दांच काँग्रेसने टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -