घरCORONA UPDATEIndian Railway : १ जूनपासून नॉन एसी रेल्वे सुरू होणार! रेल्वेमंत्र्यांची मोठी...

Indian Railway : १ जूनपासून नॉन एसी रेल्वे सुरू होणार! रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा!

Subscribe

गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वेने प्रवासी वाहतूक बंद ठेवली आहे. रेल्वे सुरू झाल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने प्रवासी वाहतूक इतक्या मोठ्या काळासाठी बंद ठेवली आहे. मात्र, आता अखेर ती प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू होणार असून रेल्वेमंत्र्यांनीच ट्वीटवरून ही घोषणा केली आहे. येत्या १ जूनपासून देशात नॉन एसी रेल्वे सुरू होणार असून त्याची ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. देशभरात रोज २०० रेल्वे धावणार आहेत. मात्र, त्याचे बुकिंग नेमके कधीपासून सुरू होणार, याविषयी मात्र रेल्वेमंत्र्यांनी माहिती दिलीली नाही.

- Advertisement -

दरम्यान, देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना नेणाऱ्या श्रमिक ट्रेन सध्या दिवसाला २०० धावत आहेत. लवकरच त्यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं देखील रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -