प्रियंकाची काळजी घ्या – रॉबर्ट वड्रा

'प्रियंकाला देशाच्या सेवेसाठी भारतीयांकडे सोपवत आहे. कृपया त्यांची काळजी घ्या', असे रॉबर्ट वड्रा म्हणाले आहेत. यासंबंधी त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट टाकली आहे.

New Delhi
Robert vadra says tack care of priyanka to indians trough facebook post
'प्रियंकाला देशाच्या सेवेसाठी भारतीयांकडे सोपवत आहे. कृपया त्यांची काळजी घ्या', असे रॉबर्ट वड्रा म्हणाले आहेत. यासंबंधी त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट टाकली आहे.

प्रियंका गांधी आता भारतीय राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये पक्षाच्या मागणीनुसार प्रियंका प्रचारसभांमध्ये दिसणार आहेत. दरम्यान, आज प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यापासून आज पहिल्यांदा काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये भव्य रोड शोचे आयोजन केले होते. या रोड शोचे आयोजन उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे करण्यात आले होते. लखनौ विमानतळापासून ते काँग्रेस कार्यालय असा १५ किलोमीटरचा हा रोड शो होता. दरम्यान, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी आपल्या पत्नी संबंधीत एक भावनिक पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. ‘प्रियंकाला देशाच्या सेवेसाठी मी तुमच्याकडे सोपवत, कृपया त्यांची काळजी घ्या’, असे रॉबर्ट वड्रा यांनी म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले रॉबर्ट वड्रा?

रॉबर्ट वड्रा यांनी आपली पत्नी प्रियंका गांधीला तिच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रॉबर्ट वड्रा म्हणाले की, ‘प्रियंका आपल्याला उत्तर प्रदेशात काम करण्यासाठी आणि भारतीय जनतेच्या सेवेच्या नव्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! आपण माझी एक चांगली मैत्रीण आहात. त्याचबरोबर आदर्श पत्नी आणि एक चांगली आईदेखील आहात. भारतात फार संवेदनशील आणि भ्रष्ट राजकीय वातावरण आहे. मात्र, मला माहित आहे की, लोकांची सेवा करणं, हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी प्रियंकाला देशाच्या सेवेसाठी भारतीय लोकांकडे सोपवत आहे. कृपया त्यांची काळजी घ्या.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here