घरदेश-विदेशएनडी तिवारींचा मुलगा रोहित शेखरचा खून

एनडी तिवारींचा मुलगा रोहित शेखरचा खून

Subscribe

रोहित शेखरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून खून असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

कॉँग्रेसचे दिवंगत नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रोहित शेखर यांचा मंगळवारी दिल्ली येथील निवासस्थानी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे निकटवर्तीयांनी म्हटले होते. मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यात त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून किंवा तोंड दाबल्याने गुदमरून झाला असावा असे म्हटले आहे. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले असून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नारायण दत्त तिवारी यांच्या दुसऱ्या पत्नीचा रोहित हा मुलगा होता. मात्र सुरवातीला त्यांनी त्याचा स्वीकार करायला नकार दिल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. कोर्टाने डीएनए चाचणीची परवानगी दिली, मात्र त्यानंतर तिवारी यांनी रोहित याचा मुलगा म्हणून आणि त्याच्या आईचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

- Advertisement -

रोहित शेखर दिल्लीतील डिफेन्स कॉलनी परिसरात राहत होते. मंगळवारी रुग्णवाहिकेतून त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांची पत्नी दिल्लीबाहेर होती. तसेच घरातील दोन सीसीटीव्ही कॅमेरे बंद आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्या पत्नीसह कुटुंबियांची चौकशी करण्याचे ठरविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -