घरअर्थजगतशेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १,११४ अंकानी कोसळला, गुंतवणूकदारांचं कोटींचं नुकसान

शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १,११४ अंकानी कोसळला, गुंतवणूकदारांचं कोटींचं नुकसान

Subscribe

शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex) १११४.८२ अंकांनी कोसळून ३६,५५३.६० वर बंद झाला. तर निफ्टी ३२६.३० अंकांनी घसरुन १०,८०५.५५ वर बंद झाला. कोरोनाची दुसरी लाट आणि युरोपमध्ये वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता यामुळे बाजारात मोठी घसरण झाल्याचं बोललं जात आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता इतर सर्व शेअर्सचा सेन्सेक्स कोसळला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँकेचे शेअर्स ७.१० टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे बजाज फायनान्सच्या शेअर्समध्येही ६.६३ टक्क्यांनी घसरण झाली. महिंद्रा आणि महिंद्राच्या शेअर्समध्ये ६.३७ टक्क्यांनी घट झाली.

याखेरीज टेक महिंद्रा आणि टीसीएसच्या शेअर्समध्येही पाच टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह आणि एसबीआयच्या शेअर्सच्या तुलनेत चार टक्क्यांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. याशिवाय भारती एअरटेल, आयटीसी, सन फार्मा, एचसीएल टेक, मारुती, एनपीटीसी, पॉवरग्रीड, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, ओएनजीसी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एशियन पेंट, लार्सन अँड टुब्रो आणि नेस्ले इंडिया शेअर्स लाल चिन्हांवर बंद झाले.

- Advertisement -

share market

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -