अजब! दोन समलैंगिक मातांच्या पोटी वाढला एकचं गर्भ!

'Shared motherhood': Lesbian couple in UK first to carry baby in both their wombs
अजब! दोन समलैगिंक मातांच्या पोटी वाढला एकचं गर्भ!

आपण गर्भाशय प्रत्यारोपण बद्दल ऐकलं असलेचं. मात्र तुम्ही कधी अंडाशय प्रत्यारोपणबद्दल ऐकलं आहे का? असं काहीस घडलं आहे युकेमध्ये. युके मधील समलैंगिक महिला जोडप्याने दोन गर्भात एकाचं बाळाला जोपसलेलं आहे. पहिल्यांदाच हे समलैंगिक महिला जोडप्याने आपल्या दोन गर्भात बाळ जोपसणारे पहिले पालक ठरले आहेत. दोन महिन्यांपूर्वी जास्मिन फ्रान्सिस स्मिथ (वय २८) हिने विट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेद्वारे एका मुलाला जन्म दिला. तसंच जास्मिनची पत्नी डोना हिच्या गर्भाशयात पहिल्यांदाच विट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेद्वारे अंडाशय प्रत्यारोपण केले.

या केलेल्या प्रक्रियेला लंडनमधील महिला क्लिनिकने ‘शेअर्ड मदरहुड’ असं नावं दिलं आहे. हा सर्व उपचार या दोन्ही महिलांवर लंडनमधील महिला क्लिनिकनेद्वारे करण्यात आला. डोनाच्या गर्भाशयात अंडाशय हे १८ तासांपर्यंत ठेवले आणि उर्वरित काळासाठी ते अंडाशय जास्मिनच्या गर्भाशयात प्रत्यारोपण केले. एस्सेक्सच्या कोल्चेस्टरमध्ये ३० सप्टेंबरला जास्मिने दोन गर्भामध्ये वाढलेल्या ओटिस या बाळांला जन्म दिला.

आपण बरेच समलैंगिक जोडपे पाहिले आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती ही संपूर्ण गर्भ वाढवते आणि बाळाला जन्म देते. आम्ही दोघी एकमेकांमध्ये खूप गुंतलो आहोत. आमच्या दोघांचे ओटिस सोबत खास बंध आहे, असं डोना म्हणाली.

पुढे डोना म्हणाली की, ते माझं अंडाशय आहे. हेच माझं अंडाशय नंतर जास्मिनच्या गर्भाशय प्रत्यारोपण केलं. ओटिस जन्माला येण्या अगोदर ते अंडाशय माझ्या गर्भात १८ तासांकरिता होत.

अशी प्रक्रिया पहिल्यांच झाली आहे. हे फार आश्चर्यचकित करणारे आहे. समलैंगिक जोडप्यांना बाळाला एकत्र जन्म देण्याची इच्छा असते. आता हे करणं शक्य झालं आहे, असं डॉ. निक मॅकलॉन यांनी सांगितलं.

दोघांना संपूर्ण उपचार समान होते, असं या समलैंगिक जोडप्यानं सांगितलं. एका डेटिंग अॅपद्वारे २०१४ मध्ये या जोडप्याची भेट झाली होती आणि त्यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले.


हेही वाचा – VIDEO : बॉलरने विकेट घेतल्यानंतर प्रेक्षकांना भन्नाट जादू दाखवली!